सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:26 PM2022-01-20T16:26:21+5:302022-01-20T16:26:28+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Solapur Municipal Commissioner P. Shivshankar contracted corona for the second time | सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

googlenewsNext

सोलापूर - महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली. मात्र चिंतेचे कारण नाही. प्रकृती लवकरच बरी होईल, असे आयुक्तांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोलापुरची स्थिती हाताबाहेर गेली असताना पी. शिवशंकर यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. रुग्णांना बेड मिळत नव्हते. यादरम्यान विविध रुग्णालयांना भेटी देत असताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. आता तिसऱ्या लाटेत मंगळवारी घसा दुखण्याचा त्रास सुरू झाला. ताप आल्याचे कारण झाले. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आपण घरात राहूनच उपचार घेत आहोत. प्रकृती स्थिर असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, उपायुक्त धनराज पांडे कोरोनामुक्त झाले असून कामावर रुजू आहेत. सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

Web Title: Solapur Municipal Commissioner P. Shivshankar contracted corona for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.