प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 03:57 PM2022-04-08T15:57:47+5:302022-04-08T15:57:52+5:30
कमी प्रतिसाद : सर्व साहित्य, डाटा ऑपरेटरचे कामही थांबविले
साेलापूर - काेराेना लसीकरणासाठी लाेकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने खासगी लसीकरण केंद्रे बंद केल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी गुरुवारी सांगितले. आता केवळ शासकीय आराेग्य केंद्रावर लस मिळणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील एकूण ४१ लसीकरण केंद्रावर काेराेनाची लस देण्याचे नियाेजन केले हाेते. यात महापालिकेच्या १६ नागरी आराेग्य केंद्रांचा समावेश हाेता. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लस घेण्यास गर्दी झाली. लाेक पहाटे पाच वाजल्यापासून नागरी आराेग्य केंद्राबाहेर रांगा लावत हाेते. सध्या ९१ टक्के नागरिकांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेतला आहे. ७० टक्के नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. दुसरा डाेस घेण्याचे लाेक पुढे येत नाहीत. जानेवारी महिन्यात दुसरा डाेस घेण्यासाठी गर्दी झाली हाेती. मात्र लाट ओसरल्यानंतर लाेक फिरकले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दुसरा डाेस घेण्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे साेमवारपासून खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी सर्वाेपचार रुग्णालय, विमा रुग्णालय आणि महापालिकेच्या नागरी आराेग्य केंद्रामध्ये आता काेराेनाची माेफत लस मिळणार आहे.
--
आपल्या मुलांची काळजी घ्या
पालिकेने खासगी लसीकरण केंद्रावर लस, व्हॅक्सिनेटर, डाटा ऑपरेटर आदी पुरविले हाेते. डाटा ऑपरेटरचे मानधनही पालिकेतून दिले जायचे. या सर्व सुविधा बंद हाेणार आहेत. लस न घेतलेल्या नागरिकांनी बिनधास्त राहू नये. नागरिकांनी शाळेत आणि परिसरातील केंद्रात लहान मुलांसाठी उपलब्ध असलेली लस घ्यावी. काेराेनाची लाट पूर्णपणे ओसरली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ज्यांनी दुसरा डाेस घेतला त्यांनी बुस्टर घ्यावा. ज्यांनी दुसरा डाेस घेतला नाही त्यांनी जीवाशी खेळ करू नये, असेही पांडे यांनी सांगितले.