सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:58 AM2018-05-03T11:58:40+5:302018-05-03T11:58:40+5:30

महापौरांची घोषणा : स्थापना दिनानिमित्त गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार 

Solapur Municipal Corporation increases the Dearness Allowance of 7 percent | सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांचा महागाई भत्ता १२५ वरून १३२ पर्यंत वाढसोलापूर शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध - महापौर बनशेट्टी

सोलापूर: महानगरपालिकेतर्फे १ मे महाराष्ट्र दिन व महापालिकेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते इंद्रभुवनसमोर ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृहनेता संजय कोळी, परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के, गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक विनोद भोसले, श्रीनिवास करली, नगरसेविका संगीता जाधव, ज्योती बमगोंडे, वौष्णवी करगुळे, कामिनी आडम, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, सहायक आयुक्त अभिजित हराळे, प्रशासन अधिकारी सुधा साळुंके, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, विजय राठोड, संजय धनशेट्टी, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, करसंकलन अधिकारी आर. पी. गायकवाड, सफाई अधीक्षक संजय जोगदनकर, अग्निशामक दलप्रमुख केदार आवटे, आयुक्तांचे स्वीय सहायक राहुल कुलकर्णी, क्षीरसागर उपस्थित होते. 

 याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर बनशेट्टी यांनी १ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे कामगारांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात कामगारांचे रक्त सांडले, त्याची आठवण म्हणून आज जागतिक स्तरावर १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

सोलापूर शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ‘नगरसेवा हीच ईश सेवा’ या महापालिकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाºयांनी नागरिकांना सोयी देण्यासाठी काम करावे, असे आवाहन करतानाच कर्मचाºयांचा महागाई भत्ता १२५ वरून १३२ पर्यंत वाढ देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी केले. 

११ गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ११ गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. विठ्ठल सोडल (आरोग्य विभाग), अवेक्षक अण्णाराव बिराजदार (पाणीपुरवठा), आरोग्य निरीक्षक अब्दुल्ला खान, लिपिक सविता केंभावी (लेखापाल कार्यालय), नागेश वेदपाठक (आरोग्य कार्यालय), गोपाल बेरे (गवसु वसुली), राजू मंजरतकर (कामगार कल्याण), मजूर मोहन मडिवाळ (उद्यान), श्रीनिवास मिसालोलू (नगर अभियंता), चालक चंद्रकांत देवरे (अग्निशामक दल), यल्लप्पा मग्रुमखाने (झोन क्र. ८) यांचा समावेश आहे. 

Web Title: Solapur Municipal Corporation increases the Dearness Allowance of 7 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.