सोलापूर महापालिकेत आता ई-ऑफिस प्रणाली; कर्मचाºयांची घेणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:45 PM2020-08-07T12:45:20+5:302020-08-07T12:48:49+5:30
कागदी घोड्यांचा बाजार बंद होणार; परीक्षेत नापास होणाºयांचे होणार डिमोशन
सोलापूर : महापालिकेतील कागदी घोड्यांचा बाजार बंद करून ‘ई-ऑफिस ’ प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी १७ आॅगस्ट रोजी लिपिक वर्गातील ६०० हून अधिक कर्मचाºयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेत नापास होणाºया कर्मचाºयांचे ‘डिमोशन’ होईल. त्यांना घरचा रस्ताही दाखविला जाऊ शकतो, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या माध्यमातून काही महापालिकांनी ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली सोलापुरातही लागू करण्याचा निर्णय आयुक्त शिवशंकर यांनी घेतला आहे. या कामासाठी लागणारे तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर माहिती तंत्रज्ञान खात्याकडून पुरवण्यात येईल. पालिकेतील विविध कामांचे प्रस्ताव संगणकावर तयार केले जातील. या कामांवरील अधिकाºयांची टिपणी आॅनलाईन अपलोड करावी लागेल. त्यावर संबंधित लिपिक, अधिकाºयांची डिजिटल सही असेल. ही फाईल कोणत्या अधिकाºयाकडे प्रलंबित आहे याची माहिती आयुक्त, उपायुक्त यांना आॅनलाईन पाहता येईल. यामुळे एकाच टेबलावर अनेक वर्षे फाईली प्रलंबित ठेवण्याचे प्रकार बंद होतील.
मनपातील कायम कर्मचाºयांना ई-ऑफिसमध्ये काम येणे बंधनकारक आहे. अनेक तरुण कर्मचाºयांना चांगले काम येते. त्यांना प्रमोशन देण्यात येईल. ज्यांना काम येत नाही त्यांनी ते शिकून घ्यावे, अन्यथा घरी बसावे. ई-आॅफिस हे नागरिकांच्या सोयीचे आहे. गतिमान कारभारासाठी आवश्यक आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.