सोलापूर महापालिका अग्निशामक दलासाठी फोम अन् पाण्याच्या गाड्या खरेदी करणार!
By Appasaheb.patil | Updated: March 13, 2023 15:52 IST2023-03-13T15:51:52+5:302023-03-13T15:52:16+5:30
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्यांना आगी लागत आहे. या परिसरात अग्निशामक दल केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत.

सोलापूर महापालिका अग्निशामक दलासाठी फोम अन् पाण्याच्या गाड्या खरेदी करणार!
सोलापूर : अग्निशामक दलाची एक फोम व एक पाण्याची गाडी यासाठी दोन कोटी तीस लाखाचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक इतर उपकरणाचाही समावेश राहणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्यांना आगी लागत आहे. या परिसरात अग्निशामक दल केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. तत्पूर्वीच दोन अत्याधुनिक यंत्रसामुग्रीयुक्त असलेल्या गाड्या खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव डीपीसीकडे पाठविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी मधील सर्व कारखानदारांनी अग्निशामक यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कारखान्यात साईड मार्जिन सोडणे गरजेचे आहे. नियमानुसार सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व कारखानदारांनी फायर ऑडिट करणेही आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी स्पष्ट केले