सोलापूर महापालिकेची ड्रेनेज गाडी मोहोळ शहरात उपसते चोरी चोरी ड्रेनेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:29 AM2018-03-17T11:29:44+5:302018-03-17T11:29:44+5:30
सभागृहनेत्यांसह नगसेवकांनी उघड केला प्रकार, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले चौकशीचे आदेश
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची ड्रेनेज साफ करणारी गाडी शनिवार १७ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास मोहोळ शहरात काम करताना सापडली़ याप्रकरणी सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, कैय्यावाले हे मोहोळकडे जात असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास मोहोळ शहरात आरोग्य विभागाची ड्रेनेज साफ करणारी गाडी (एमएच १३ एएक्स २३९१) आढळली़
याबाबत सभागृहनेते संजय कोळी यांनी त्यांची कार थांबवून ड्रेनेज साफ करणाºया गाडीजवळ असणाºया दोन कर्मचाºयांकडे चौकशी केली़ महापालिका हद्द सोडून ही गाडी ग्रामीण भागातील मोहोळ येथे कशी आली अशी विचारणा केल्यावर १५ हजार रूपये घेऊन मोहोळ येथील ड्रेनेज सफाईचे काम करण्यात येत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले़ याबाबत सभागृहनेते संजय कोळी ही माहिती आयुक्त अविनाश ढाकणे यांना दिली़ त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त त्र्यिंबक ढेंगळे-पाटील यांना दिले़
सोलापूर शहरातील हद्दवाढ विभागात ड्रेनेज नसल्याने सेफ्टी टँकची समस्या गंभीर आहे़ सेफ्टी टँक भरल्याने ड्रेनेज तुंबते याची सफाई करण्यासाठी या गाडीचा उपयोग होतो़ अनेक नागरिक या गाडीच्या प्रतिक्षेत असतात पण वेळेवर सेवा दिली जात नाही़ ज्यादा पैसे घेऊन ग्रामीण भागात ही गाडी घेऊन जाण्याचा हा प्रकार गंभीर असल्याची तक्रार सभागृहनेते संजय कोळी यांनी केली़