सोलापूर महापालिका कर्मचाºयांची हजेरी आता पोर्टलद्वारे, नोंदणीची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:08 PM2017-11-02T14:08:02+5:302017-11-02T14:12:56+5:30
मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेने शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे मनपातील कर्मचाºयांची हजेरी नोंदविण्याची तयारी केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : मुंबई महापालिकेनंतर सोलापूर महापालिकेने शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे मनपातील कर्मचाºयांची हजेरी नोंदविण्याची तयारी केली आहे.
मुंबई महापालिकेतील सुमारे सव्वालाख कर्मचाºयांची हजेरी शासनाच्या अटेंडंट पोर्टलद्वारे घेतली जाते. यात कर्मचारी जेथे काम करीत आहे, तेथील संगणकाशी जोडलेल्या डिव्हाईसवर बोट ठेवून हजेरी नोंदवू शकेल. यामुळे कर्मचाºयांना हजेरी देण्यासाठी करावी लागणारी धावपळ वाचणार आहे. हजेरी पुस्तकापर्यंत पोहोचणे, तेथील रांगेत थांबणे ही कटकट संपविण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अंमलात आली. पण यासाठी बायोमेट्रिक संच खरेदीसाठी खर्च येतो. याशिवाय प्रत्येक विभागात एकच संच बसविला तर कार्यालय सुरू होताना व बंद होताना कर्मचाºयांना रांगा लावाव्या लागत होत्या. त्यावर शासनाने वेबपोर्टलवर अटेंडंट डॉट जीओ ही सुविधा उपलब्ध केली आहे. मुंबई महापालिकेने एमएचएमसीजेएम या नावे वेब हजेरी या पोर्टलवर सुरू केली आहे.
याच धर्तीवर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बुधवारी एमएचएसएमसी या नावे सोलापूर मनपाची वेब सुरू करण्यास एनआयसीकडे नोंदणी केली आहे. वेब पोर्टलची लिंक देण्याचे अधिकार एनआयसीकडे आहेत. ही लिंक मिळाल्यावर मनपातील सर्व संगणकांना ही जोडली जाईल व सर्व विभाग व कार्यालयात असे डिव्हाईस जोडले जातील. या डिव्हाईसचा खर्च खूपच कमी असून, कर्मचाºयांना हजेरी नोंदविणे सोपे होणार आहे.
-----------------------
हजेरीचे होणार फायदे..
वेब पोर्टलवरील हजेरीमुळे कर्मचाºयांना कोणत्याही संगणकावरील डिव्हाईसवर हजेरी देणे सहज शक्य होईल. कार्यालयीन वेळेत किती कर्मचारी आले हे लागलीच समजून येईल. तसेच कर्मचारी कोणत्या वेळी कोणत्या विभागात काम करीत आहे हे दिसून येईल. एका क्लिकवर सर्व कर्मचाºयांचे हजेरी रेकॉर्ड समोर येईल. सफाई कर्मचाºयांना हजेरीची सुविधा कशी द्यायची याबाबत तपासणी केली जात आहे.