सोलापूर महानगरपालिका मालामाल, जीएसटीपोटी १८ कोटी अनुदान प्राप्त
By appasaheb.dilip.patil | Published: August 3, 2017 01:01 PM2017-08-03T13:01:33+5:302017-08-03T13:01:45+5:30
सोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे.
यापूर्वी मनपाला एलबीटीपोटी १४ कोटी अनुदान दिले जात होते. त्यातून कर्मचाºयांचे वेतन कसेबसे भागविले जात होते. जीएसटीची चर्चा सुरू झाल्यावर एलबीटी अनुदान थकले होते. यात दोन महिन्यांचे अनुदान वेळेत न आल्याने कर्मचाºयांचा पगार लांबला होता. यातून आंदोलने झाली. पण आता जीएसटी लागू झाल्यापासून अनुदानात घसघशीत साडेचार कोटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे मनपा मालामाल झाली आहे. कर्मचाºयांचा वेतनाचा प्रश्न तर सुटला, वीज बिलाचे टेन्शनही संपले आहे. गेल्या महिन्यातही जीएसटीपूर्व १८ कोटी अनुदान आले होते. या महिन्याचे अनुदान अदा करण्याचा अध्यादेश मंगळवारी राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला. यात राज्यातील २६ महापालिकांना १४0४ कोटी ९ लाख अनुदान मंजूर केले आहे. मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम येत्या दोन-तीन दिवसात मनपाच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.