थकबाकीपोटी सोलापूर महानगरपालिकेने ३६ नळ तोडले, ५ घरे सील, १.३२ कोटींची वसुली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:26 PM2017-12-18T12:26:04+5:302017-12-18T12:27:24+5:30
मनपाने मिळतकराची थकबाकी वसुलीपोटी उघडलेल्या मोहिमेत रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू होती. शहर व हद्दवाढ विभागातून दोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली करण्यात आली. दरम्यान, मोहिमेत थकबाकीपोटी ३६ जणांचे नळकनेक्शन तोडण्यात आले तर पाच घरे सील करण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : मनपाने मिळतकराची थकबाकी वसुलीपोटी उघडलेल्या मोहिमेत रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू होती. शहर व हद्दवाढ विभागातून दोन दिवसात एक कोटी ३२ लाख ५४ हजार ८६५ रुपये वसुली करण्यात आली. दरम्यान, मोहिमेत थकबाकीपोटी ३६ जणांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले तर पाच घरे सील करण्यात आली.
थकबाकी वसुलीसाठी शहर व हद्दवाढ विभागात ४०० कर्मचाºयांची ५२ पथके फिरत आहेत. शनिवारी शहरी विभागात ३० लाख २९ हजार २४७ रोख तर १४ लाख ६ हजार २९६ रुपयांचे धनादेश अशी ४४ लाख ३५ हजार ५४३ रुपयांची वसुली झाली. हद्दवाढ विभागात २७ लाख ५७ हजार ४७७ रुपये रोख तर १७ लाख ६९ हजार ९३७ रुपयांचे धनादेश अशी ४५ लाख २७ हजार ४१४ रुपये वसुली झाली. अशाप्रकारे दोन्ही विभागातून ५७ लाख ८६ हजार ७२४ रुपये रोख तर ३१ लाख ७६ हजार २३३ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. थकबाकी न भरणाºया शहरी विभागातील १९ जणांचे नळ तोडले तर ३ जणांची मिळकत सील करण्यात आली. हद्दवाढ भागातील पाच जणांचे नळ तोडण्यात आले व दोन मिळकती सील करण्यात आल्या.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १५ डिसेंबर रोजी ७८ लाख २९ हजार १८६ रुपयांची करवसुली झाली. यात २५ मिळकतदारांचे नळकनेक्शन तोडण्यात आले तर एक मिळकत सील करण्यात आली. रविवारी सुटीच्या दिवशीही करवसुली मोहीम सुरूच ठेवण्यात आली.
रविवारी शहर हद्दवाढ भागातून २१ लाख ६० हजार २४५ रुपये वसुली झाली आहे. तर कर आकारणी विभागाने २१ लाख ९४ हजार ६२० रुपये वसुली केली आहे. रविवारी ११२ मिळकतदारांचे नळ सील करण्यात आले. मोठे मिळकतदार टारगेट ठेवून कारवाई सुरूच ठेवली असल्याची माहिती उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.