Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार

By रवींद्र देशमुख | Published: November 6, 2023 06:24 PM2023-11-06T18:24:43+5:302023-11-06T18:25:30+5:30

Solapur News: दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Solapur: Murder case filed against father for stabbing son, assault for asking money for liquor | Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार

Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार

- रवींद्र देशमुख 
सोलापूर - दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनिवास मल्लय्या यासम (वय- ३२, रा. लक्ष्मी चौक, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताची पत्नी वाणिश्री श्रीनिवास यासम (वय- २५) हिच्या फिर्यादीनुसार सासरा मल्लय्या आगय्या यासम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला आहे.

यातील मयत श्रीनिवास हा मल्लय्या यांचा मुलगा आहे. जुना विडी घरकूल परिसरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. मयत मुलगा श्रीनिवास हा दारुसाठी पैसे दे म्हणून नेहमी वडिलाला मारहाण करायचा. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारुसाठी मयत मुलानं भांडण काढले. नेहमीच्या या प्रकाराला चिडून मल्लय्या याने किचनमधून चाकू आणून मुलगा श्रीनिवास याच्या गळ्यावर, डाव्या डोळ्याच्या खाली, दंडावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत मयताचा भाऊ विनायक याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तो त्यावेळी शुद्धीवर होता मात्र णोलत नव्हता. रात्री १०:४५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मयत श्रीनिवासची पत्नी वाणिश्री हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आधी दाखल झालेल्या भादंवि ३०७ कलमानुसार गुन्ह्यात ३०२ खुनाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तपास सपोनि चौधरी करीत आहेत.

 

Web Title: Solapur: Murder case filed against father for stabbing son, assault for asking money for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.