Solapur | पाटकूलजवळ उजनीचा कालवा फुटला, गाळाने विहीरी बुजल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:33 IST2023-01-29T14:32:34+5:302023-01-29T14:33:11+5:30
मोठ्या जलप्रवाहामुळे पिके पाण्यात

Solapur | पाटकूलजवळ उजनीचा कालवा फुटला, गाळाने विहीरी बुजल्या
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथून जाणारा उजनीचा डावा उजवा कालवा सकाळी सहा वाजता खरात वस्ती येथे फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुटलेला हा कालवा साधारण ५० वर्षांहून जुना आहे.
मोहोळसह पंढरपूर तालुक्यातील शेकडो एकरातील पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. तसेच जवळपास चार ते पाच विहीरींमध्ये गाळ जाऊन पुर्ण भरलेल्या आहेत. काढणीला आलेले द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके पूर्णपणे पाण्यासाठी गेली आहेत. शिवाय अनेकांच्या घरामध्येही पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.
उजनीतून पाणी साेडण्यात आल्यामुळे सुमारे तासभर पाण्याचा प्रवाह वेगाने सुरूच होता. उजनीतून पाणी सोडणे बंद केल्यानंतरही वाहत गेले. दुपारी १२ वाजल्यानंतर उजनी कालव्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महसूल प्रशासनाला माहिती देऊन नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहे. नुकसानीचा आकडाही मोठा असणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.