सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या पोहोचली ३३७ वर
By appasaheb.patil | Published: May 15, 2020 02:38 PM2020-05-15T14:38:37+5:302020-05-15T14:41:58+5:30
सकाळच्या सत्रात ७४ जणांचे अहवाल प्राप्त; आतापर्यंत मृतांची संख्या २२
Next
ठळक मुद्देसोलापुरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढलीकोरोनाबरोबरच सारी या आजाराचेही रूग्ण वाढलेआतापर्यंत कोरोना या आजाराने २२ जणांचा मृत्यू
सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधितांचा आकडा थांबता थांबेनासे झाला आहे़ शुक्रवारी सकाळच्या सत्रात मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात नव्याने ७ रूग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रूग्णसंख्या ३३७ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३५५५ चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ३२१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ३३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रूग्णांची संख्या २२ एवढी झाली आहे. दरम्यान, बरे होऊन गेलेल्या रूग्णांची संख्या १०६ इतकी आहे.