सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग: सात गावांचा संयुक्त सर्व्हे पूर्ण; वसंतविहारजवळचे काम अपूर्ण
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 26, 2022 08:51 PM2022-12-26T20:51:14+5:302022-12-26T20:51:43+5:30
सोलापुरातील नऊपैकी सात गावांचा सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर : वसंत विहारच्या बाजूने जाणाऱ्या सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम अपूर्ण असून सिटी सर्व्हे विभागाकडून लवकरच मोजणीचे काम सुरू होईल. जवळपास बाराशे मीटरचा रेल्वे मार्ग या परिसरातून जाणार आहे. यासोबत सोलापुरातील नऊपैकी सात गावांचा सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बाळे, भोगाव, बाणेगाव, मार्डी, वनसळ, सेवालाल नगर तसेच उत्तर सोलापूर भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. सर्व्हेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून जिल्हा भूसंपादन विभागाकडे तसेच रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आराखडा सादर करू, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सिटी सर्व्हे परिसरात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील काही भागाचा आणि खेड गावाचा संयुक्त सर्व्हे बाकी आहे.