Solapur: पंढरपूर, अकलूज बाजार समिती भाजपाकडे; कुर्डूवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच!

By रवींद्र देशमुख | Published: April 29, 2023 03:06 PM2023-04-29T15:06:48+5:302023-04-29T15:07:07+5:30

Solapur: पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे.

Solapur: Pandharpur, Akluj Bazar Committee to BJP; The key of Kurduwadi belongs to Shinde brothers of NCP! | Solapur: पंढरपूर, अकलूज बाजार समिती भाजपाकडे; कुर्डूवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच!

Solapur: पंढरपूर, अकलूज बाजार समिती भाजपाकडे; कुर्डूवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच!

googlenewsNext

- रवींद्र देशमुख 
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूज कुर्डूवाडी या तीन बाजार समितीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. पंढरपुरात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व अकलूजमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांना बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. तर कुर्डूवाडी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच बाजार समिती शुक्रवारी शांततेत व चुरशीने मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मंगळवेढा बाजार समितीसाठी शुक्रवारीच मतमोजणी झाली. मंगळवेढ्यातील तेरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित पाच जागाही आवताडे गटाला मिळाल्या त्यामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे व त्यांचे बंधू डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्याकडे सत्ता राहिली आहे. 

अक्कलकोट बाजार समितीची मतमोजणी रविवारी होणार आहे. तसेच सांगोला व दुधनी बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Web Title: Solapur: Pandharpur, Akluj Bazar Committee to BJP; The key of Kurduwadi belongs to Shinde brothers of NCP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.