Solapur: पांडुरंगाच्या पालखीसोबत अरणला जाताना वाहनाने ठोकरले! वारकऱ्याचा मृत्यू
By रवींद्र देशमुख | Updated: July 16, 2023 16:16 IST2023-07-16T16:15:59+5:302023-07-16T16:16:15+5:30
Solapur: वारीसोबत पायी जात असताना अरण गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाला. बलभीम मारुती गाकवाड असे त्या वारकऱ्याचे नाव आहे.

Solapur: पांडुरंगाच्या पालखीसोबत अरणला जाताना वाहनाने ठोकरले! वारकऱ्याचा मृत्यू
- रवींद्र देशमुख
सोलापूर : वारीसोबत पायी जात असताना अरण गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाला. बलभीम मारुती गाकवाड ( वय ७७, रा. पंढरपूर) असे त्या वारकऱ्याचे नाव आहे.
मृत बलभीम गाकयावाड हे पंढरपूर ते अरण असे पायी जात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून ठोकरले. यामुळे त्यांना डोक्याला, हाताला, छातीला मार लागल्याने ते बेशुध्द झाले. त्यांना लगेच उपचारासाठी वरवडे टोल नाका येथील ॲम्ब्युलन्सने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.