Solapur: एसटी बसचे चाक पायावरुन गेल्यानं स्थानकात प्रवाशाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: June 1, 2024 18:45 IST2024-06-01T18:44:40+5:302024-06-01T18:45:01+5:30
Solapur News: प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसचे पुढील चाक एका अनोळखी प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

Solapur: एसटी बसचे चाक पायावरुन गेल्यानं स्थानकात प्रवाशाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा
- विलास जळकोटकर
सोलापूर - प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसचे पुढील चाक एका अनोळखी प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे वय ५३ च्या आसपास असून, पोलीस त्याच्या वारसाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश भद्रशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गुरुवारच्या रात्री ११ सुमारास सोलापूर बसस्थानकातून एम. एच. १४ एल बी ०९१७ ही एस. टी. बस स्थानकातील शौचालय बाथरुमसमोरुन पास होताना त्यांनी निष्क़ाळजी पणेवाहन चालवल्याने समोर आलेल्या ५३ वर्षाच्या प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन बसचे समोरी चालक गेले.
यामध्ये संबंधीत प्रवासी गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. संबंधीत प्रवाशाची अद्याप ओळख पटली नसून यासाठी फौजदार चावडी पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे तपास अधिकारी सपोनि बारावरकर यांनी सांगितले.