सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची बदली
By Appasaheb.patil | Updated: May 24, 2019 19:25 IST2019-05-24T19:10:59+5:302019-05-24T19:25:06+5:30
गडचिरोली येथील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची बदली
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची गडचिरोली येथे पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे.
गडचिरोली येथील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे़ याबाबतचा आदेश गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शुक्रवार २४ मे रोजी काढले.
राज्यातील ९ आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त एस़ एच़ महावरकर यांची अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहरात बदली करण्यात आली आहे. याशिवाय अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुण्याचे रविंद्र पी़ सेनगांवकर याची पोलीस आयुक्त, रेल्वे, मुंबई येथे, मकरंद मधुसुदन रानडे यांची अप्पर आयुक्त पिंपरी चिंचवड या पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, राजेश प्रधान अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई याची विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...