सोलापूरात पोलीसांची अवैध धंद्यावर धाड, दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:10 AM2017-10-07T11:10:59+5:302017-10-07T11:11:05+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील कासेगाव व तळेहिप्परगा येथील अवैध दारू आड्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमने छापा मारल़ या कारवाईत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन ६८ हजार ७८० रूपयांचा माल हस्तगत केला़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : उत्तर सोलापूर तालुक्यातील कासेगाव व तळेहिप्परगा येथील अवैध दारू आड्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमने छापा मारल़ या कारवाईत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन ६८ हजार ७८० रूपयांचा माल हस्तगत केला़
पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कासेगाव ता.उत्तर सोलापूर व तळेहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर येथे छापा टाकून अवैधरित्या दारू विक्री व्यवसायावर धाड टाकली़ याप्रकरणी चांगदेव बाबू जाधव (वय ४९), केशव बध्दू पवार (वय ७०) यांना घेतले़ याशिवाय बाला आण्णाप्पा गायकवाड, सैफन बनेखान पठाण हे दोघे फरार आहेत़ या आरोपीविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पो.स.ई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, पो.कॉ अमोल माने, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, श्रीकांत जवळगे,अक्षय दळवी, सिध्दराम स्वामी व विष्णू बडे यांच्या यांच्या टिमने केले़