Solapur Politics; राष्ट्रवादी खुष, काँग्रेस-शिवसेनेत चिंता, भाजप-एमआयएममध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:18 PM2022-02-02T17:18:12+5:302022-02-02T17:18:18+5:30

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर : हरकती नाेंदविण्यासाठी १४ दिवसांची मुदत

Solapur Politics; NCP happy, Congress-Shiv Sena anxiety, BJP-MIM confusion | Solapur Politics; राष्ट्रवादी खुष, काँग्रेस-शिवसेनेत चिंता, भाजप-एमआयएममध्ये संभ्रम

Solapur Politics; राष्ट्रवादी खुष, काँग्रेस-शिवसेनेत चिंता, भाजप-एमआयएममध्ये संभ्रम

googlenewsNext

साेलापूर : महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सकाळी ऑनलाइन प्रसिद्ध केला. हा आराखडा भाैगाेलिक सीमांच्या आधारे केल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी याला ‘राजकीय रंग’ असल्याचा सूर नगरसेवकांनी दबक्या आवाजात काढला. राष्ट्रवादीचे नेते, इच्छुक नव्या रचनेवर खूश आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेत काहीसे चिंतेचे तर भाजप आणि एमआयएममध्ये नवी रचना कशी भेदायची याचा संभ्रम असल्याचे दिसून आले.

महापालिकेची प्रभाग रचना मंगळवारी दुपारी १२ वाजता काैन्सिल हाॅलमध्ये जाहीर हाेईल, असे आयुक्तांनी सांगितले हाेते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक काैन्सिल हाॅलमध्ये दाखल झाले हाेते. यादरम्यान सकाळी ११ वाजता पालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग रचनेची अधिसूचना, प्रभागनिहाय नकाशे, मुख्य नकाशा जाहीर करण्यात आला. काही वेळातच अनकांनी माेबाईलवर अधिसूचनेची पीडीएफ आणि नकाशे डाउनलाेड केले. आपला प्रभाग कसा आहे, काेणता भाग जाेडला, काेणता ताेडला याची माहिती जाणून घेऊ लागले. महापालिकेचा प्रभाग क्र. १ भाेगाव शिवेपासून सुरू हाेताे. यापूर्वीचाही प्रभाग याच ठिकाणाहून सुरू झाला हाेता. शेवटचा प्रभाग साेरेगाव, कुमठे आणि सिद्धेश्वर साखर कारखाना परिसराचा आहे. प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती नाेंदविता येतील.

---

दिग्गज नगरसेवकांबाबत घडले अन् बिघडलेही

राष्ट्रवादीचे नेते महेश काेठे यांनीच काही प्रभाग पूरक करून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते पालिकेत फिरकले नव्हते. गटनेता आनंद चंदनशिवे खुशीत हाेते. त्यांचा बालेकिल्ला असलेला बुधवार पेठ, बाळीवेस परिसराचा स्वतंत्र प्रभाग झाला आहे. भाजपचे माजी सभागृह नेता संजय काेळी, अनंत जाधव यांचा मंत्रीचंडक, मराठा वस्ती परिसराचा एक प्रभाग झाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसेल. डाॅ. किरण देशमुख यांचा सध्याचा प्रभाग जवळपास आहे तसाच आहे. मात्र देशमुखांची स्वारी विडी घरकूल परिसरात जाईल अशी चर्चा आहे.

--

शिवसेना कार्यकर्त्यांना कशाची चिंता

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी सेनेचे कार्यकर्ते प्रभाग रचनेवर नाराज दिसून आले. विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे हे प्रभाग क्र. १३ मधून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. मात्र या प्रभागाची भाैगाेलिक सीमा छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते रंगभवन चाैक अशी आहे. यात विजापूर वेसेचा भागही जाेडला आहे. ही रचना अनुकूल नसल्याचा अंदाज शिंदे यांना आला हाेता. देगाव, बसवेश्वर या परिसराला सेटलमेंट, रामवाडी परिसर जाेडल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांची अडचण हाेईल अशी चर्चा आहे. शहरप्रमुख गुरुशांत धूत्तरगावक यांच्या राहत्या घराचा परिसर महापाैर, सभागृह नेत्यांच्या प्रभागाला जाेडण्यात आला आहे.

---

काँग्रेस नेत्यांना कशाची चिंता?

काँग्रेस नेत्यांनी मनासारखी रचना करून घेतल्याचे सांगितले जाते. मात्र गटनेता चेतन नराेटे यांचा जुनी मिल कम्पाउंड, एनजी चाळ या परिसराला काेनापुरे चाळ, वळसंग हाॅस्पिटल परिसर जाेडण्यात आला आहे. या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण येण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती पुरुष आरक्षण आले तर काय करायचे, याची चिंता कार्यकर्त्यांमध्ये हाेती.

--

ताैफिक शेख गटातही धुसफूस

ताैफिक शेख व सहकारी नगरसेवकांच्या प्रभागांचे माेठे विभाजन झाले आहे. नई जिंदगी, साईनाथ नगर, काजल नगर प्रभागाची शकले झाली आहेत. जिथे आम्ही कामे केली तेच भाग फाेडले. हे चुकीचे झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेख यांचे कार्यकर्ते देत हाेते.

एमआयएमच्या मतदारसंघाचे विभाजन

भाजपने मागील निवडणुकीत मुस्लीम बहुल भागांचे एकत्रीकरण केले हाेते. एमआयएमचे गटनेता रियाज खरादी, वाहिदाबी भंडाले यांचा प्रभाग वगळता इतरांचे विभाजन झाले. शास्त्री नगर भागातच एमआयएमची अडचण हाेण्याची शक्यता आहे.

--

कुमठे, साेरेगावचे एकत्रीकरण

हद्दवाढमध्ये कुमठे, साेरेगाव एक केल्याने माजी नगरसेवक जयकुमार माने आणि कार्यकर्ते आनंदात दिसले. जुळे साेलापुरातील काही प्रभागांत समाधानकारक रचना असल्याने भाजपचे मनिष देशमुख आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

 

Web Title: Solapur Politics; NCP happy, Congress-Shiv Sena anxiety, BJP-MIM confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.