solapur politics; उस्मानाबाद लोकसभेसाठी दिलीप सोपल याच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:36 PM2019-01-11T12:36:40+5:302019-01-11T12:39:14+5:30

बार्शी : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतशा मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या असून, सोलापूर ...

solapur politics; Osmabad Lok Sabha Speaker Dilip Sopal | solapur politics; उस्मानाबाद लोकसभेसाठी दिलीप सोपल याच्या नावाची चर्चा

solapur politics; उस्मानाबाद लोकसभेसाठी दिलीप सोपल याच्या नावाची चर्चा

Next
ठळक मुद्देपूर्वापार बार्शी विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातच समाविष्टउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर आजपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित उमेदवारांचेच वर्चस्व राणाजगजितसिंह यांच्या पत्नीच्या नावाचीही चर्चा

बार्शी : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतशा मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या असून, सोलापूर-लातूर व उस्मानाबाद अशा तीन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना विद्यमान खासदारांना पुन्हा मैदानात पाठवणार असे गायकवाडांच्या तयारीवरुन दिसत आहे़, तर भाजपकडून डॉ़ प्रतापसिंह पाटील व राष्ट्रवादीकडून आ़ दिलीप सोपल यांच्या नावाचा बोलबाला आहे.

पूर्वापार बार्शी विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातच समाविष्ट आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर आजपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित उमेदवारांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र सलग पाचवेळा विजयी झालेल्या अरविंद तुळशीदास कांबळे यांचा पराभव करत बार्शीचे रहिवासी असलेले शिवाजी कांबळे यांनी १९९६ साली ही जागा शिवसेनेकडे खेचली होती. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर शिवाजी कांबळे यांनीच बाजी मारली होती. २००४ साली मात्र बार्शीला उमेदवारी मिळाली नाही.

मतदारसंघाच्या बाहेरील असलेल्या मंगळवेढ्याच्या प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना राष्टÑवादीने तर कळंबचे आमदार कल्पना नरहिरे यांना शिवसेनेने संधी दिली. त्यानंतर नरहिरे खासदार झाल्या. नंतर २००९ व २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बार्शीच्या उमेदवाराला कोणत्याही राष्टÑीय पक्षाने संधी दिली नाही. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार झालेल्या उमरग्याचे माजी आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना बार्शी विधानसभा मतदारसंघातून तब्बल ५४ हजार मतांची लक्षणीय आघाडी मिळाली होती. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेऊन यंदा कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युतीच्या जागावाटपात सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे़ परंतु राज्यातील वातावरण पाहता युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे़ भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे. बार्शी तालुक्यातून गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे इच्छुक आहेत़ मिरगणे यांचे तालुक्यात पक्षबांधणीमध्ये योगदान आहे. 

याबरोबरच सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातून कळंब तालुक्यातील धनेश्वरी बोरगावचे रहिवासी व गेल्या चार वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून फिरत असलेले धनेश्वरी शिक्षण संस्था संस्था समूहाचे प्रमुख डॉ़ प्रतापसिंह पाटील यांनी परवाच लातूर येथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात आहे़ त्यांचे उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे़ तसेच त्यांना राजकीय पार्श्वभूमी व सर्व पक्षात असलेले नातेसंबंध, बार्शीचे माजी आ़ राजेंद्र राऊत व विधानपरिषद सदस्य आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्याशी असलेली जवळीकता व नवा उच्चशिक्षित चेहरा म्हणून त्यांचे नाव क्रमांक एकवर आहे.

लोकसभा निवडणूक आणि माझ्या उमेदवारीची चर्चा याबाबत मी अनभिज्ञ आहे. माझ्या उमेदवारीची चर्चा ही लोकात व पक्षपातळीवर  आहे. याबाबत मलाही आमच्या पक्षाने अद्याप कसलीही विचारणा या अनुषंगाने केलेली नाही. तसेच मी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक नाही.
-दिलीप सोपल, आमदार, बार्शी

राणाजगजितसिंह यांच्या पत्नीच्या नावाचीही चर्चा
- याबरोबरच सध्या मतदारसंघात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याची़ यात बार्शीचे आ़ दिलीप सोपल यांच्या नावाला पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांची क्रमांक एकची पसंती असून, सोपल यांनी उमेदवारी घ्यावी, असा त्यांचा आग्रह आहे़ परंतु सोपल हे इच्छुक नसल्याची चर्चा आहे़ मात्र शरद पवारांच्या आग्रहामुळे त्यांच्यात गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, असे दिसत आहे़ सोपल यांच्याशिवाय आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावाचाही बोलबाला आहे़  शिवसेनेकडून विद्यमान खा़ रवींद्र गायकवाड यांच्याबरोबरच उद्योजक शंकरराव बोरकर, माजी आ़ ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा आहे़ 

Web Title: solapur politics; Osmabad Lok Sabha Speaker Dilip Sopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.