Solapur: जरांगे- पाटील यांची सोलापुरात 5 तारखेला जाहीर सभा
By राकेश कदम | Published: September 30, 2023 12:22 PM2023-09-30T12:22:02+5:302023-09-30T12:22:43+5:30
Solapur: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून जरांगे यांची जाहीर सभा 5 ऑक्टोंबर 2023 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
- राकेश कदम
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून जरांगे यांची जाहीर सभा 5 ऑक्टोंबर 2023 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अंतरवली सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
पवार म्हणाले, सकल मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 58मोर्चे काढले.पण सरकारकडून न टिकणारे आरक्षण देवून समाजाची फसवणूक केली .त्यानंतर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने मंत्री महोदयांकडे आणि शासन दरबारी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले. परंतु शासन मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असे फक्त आश्वासन देत आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यापासून सरकार तर्फे कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही. मराठा समाजाची अंतरावली येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला सोलापुरातून शेकडो समाज बांधव जाणार आहेत.