सोलापूर-पुणे ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ १५ वर्षांची झाली
By admin | Published: July 15, 2017 11:07 AM2017-07-15T11:07:31+5:302017-07-15T11:07:31+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : इंटरसिटी अर्थात सोलापूर-पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस) एक्स्प्रेसच्या सेवेला शनिवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत़ या १५ वर्षांत कोट्यवधी प्रवाशांनी प्रवास के ला आहे़ अनेक बदल या गाडीने पाहिले आहेत़ तिच्या या सेवेनिमित्त सोलापूर स्थानकावर विविध प्रवासी संघटना वाढदिवस साजरा करीत आहेत़
सकाळी पुण्याला जाण्यासाठी आणि तेथून दिवसभर कामे पूर्ण करुन पुन्हा सोलापूरला पोहोचण्यासाठी हक्काची रेल्वे असावी म्हणून १५ वर्षांपूर्वी इंटरसिटीची मागणी झाली़ १५ जुलै २००१ रोजी हक्काच्या इंटरसिटीने सोलापूर स्थानकावरुन पहिली धाव घेतली़ रेल्वेच्या सेवेत अनेक बदल झाले़ प्रवाशांनी बदलाविरोधात कुठेही तक्रारी केल्या नाहीत़ उलट हक्काच्या गाडीवर सोलापूरकरांनी प्रेम केले़ प्रथमत: या गाडीला १२ डबे जोडले गेले़ त्यानंतर त्यात वाढ करीत १७ डबे निश्चित झाले़ सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्स, रेल्वे प्रवासी संघटना, हुंडेकरी संघटना, मध्यवर्ती व्यापारी संघटना, मासिक पासधारक समिती, विभागीय सल्लागार समितीचे सदस्य आदी घटक वर्धापन दिनात सहभागी होत आहेत़
-----------------------
अन् हुतात्मा एक्स्प्रेस नामकरण झाले़़़
४सोलापूरकरांची हक्काची, लाडकी गाडी म्हणून पाहिल्या जणाऱ्या सोलापूर-पुणे एक्स्प्रेसला मधल्या काळात अनेकांनी नावे सुचवली़ इंटरसिटी या नावाने प्रवाशांमध्ये गाडीची ओळख निर्माण झाली़ कालांतराने अनेक संस्था, संघटनांनी नावे सुचवली़ मात्र रेल्वे बोर्डानेच ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ नाव निश्चित केले़ हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनी अनेक अडचणी सोसल्या़ मात्र मासिक पासधारकांसाठी स्वतंत्र डब्यांची मागणी होत आहे़ यानिमित्ताने ही मागणी पूर्ण करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे़
----------------------
वेळेत चौथ्यांदा बदल़़़
४तसे पाहता या रेल्वेने अनेक उन्हाळे, पावसाळे अनुभवले आहेत़ कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित केला आहे़ मात्र आजपर्यंत या गाडीने चार वेळा आपली वेळ बदलली आहे़ सुरुवातीला सकाळी ६ वाजता धावली़ काही दिवसांनी ही वेळ ६़२० झाली आणि पुन्हा तिचा वेळ बदलून ६़५५ करण्यात आली़ त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी ६़३० असे वेळेचे नियोजन झाले़ या बदलांना सोलापूरकरांनी विरोध न दर्शवता प्रवास आनंददायी केला़
----------------
१५ वर्षांत ही गाडी नावारुपास आली़ या गाडीचा वाढदिवस साजरा केला जावा ही प्रेरणा सर्वप्रथम तत्कालीन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्याकडून प्रवासी संघटनांना मिळाली़ १५ जुलै २००८ साली प्रथमच वर्धापन साजरा केला गेला़ तेव्हापासून प्रवासी संघाकडून इंटरसिटीचा वर्धापन दिन हा ऐतिहासिक, सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी म्हणून साजरा केला जातोय़ हुतात्माच्या सेवेत अनेक विकासात्मक बदल अपेक्षित आहेत़
- संजय पाटील,
अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ