Solapur: सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, परराज्यातून आणल्या जायच्या मुली
By विलास जळकोटकर | Published: June 6, 2023 10:09 PM2023-06-06T22:09:14+5:302023-06-06T22:09:47+5:30
Solapur: सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफाश केला.
- विलास जळकोटकर
सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफास केला. सोमवारी रात्री शिंदे चौकातील एका बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार चालत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जागा मालक, मॅनेजर, गिऱ्हाईकासह पाचजणांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार मंगळवारी गुन्हा नोंदवला आहे. कुंटणखाना चालवण्यासाठी परराज्यातून मुलींना आणले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
भीमसिंग कबीर नाईक (सूत्रधार रा. ७२५, श्री कॉर्नर चौथा मजला दक्षिण कसबा सोलापूर), फेरलिओ सुलोरराम मेस्का (मॅनेजर, वय- ३४, रा. ई ४३, चावंगा रोड, प्रेस्टिबिटेरियन चर्च, ऐजॉल, राज्य मिझोराम), ईगल विक्रम नलावडे (गिऱ्हाईक, वय- ३८, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर), काकासाहेब नागनाथ पोटभरे ( गिऱ्हाईक, वय- ४०, रा. झरेगाव, ता. बार्शी), ईलाही शेख (गिऱ्हाईक, वय- २२, रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
मॅनेजर गिऱ्हाईकांमागे ५०० रुपये घ्यायचा
पथकाने येथील मुलींशी संवाद साधला असता त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भीमसिंग परराज्यातून आणत असे. प्रत्येक गिऱ्हाईकामागे तो ५०० रुपये घेत असे. तिन्ही मुलींकडे मिळून ५,४०० रुपये व कंडोमची पाकिटे आढळून आली. गिऱ्हाईकांकडे ७ हजार ७१० रुपये आणि मॅनेजरकडे ४० हजार ५०० रुपयांची रोकड मिळून व मोबाईल मिळऊन आले.
गिऱ्हाईकांच्या नोंदीही आढळल्या
या झाडाझडतीमध्ये मोबाईलशिवाय, बिल्डिंगचे लाईटबील, सलूनचे शॉपॲक्ट, टेलिफोन बिलाबरोबर स्पॉमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांच्या नोंदही आढळून आल्या. या गिऱ्हाईकांमध्ये कोणाकोणाची नावे असतील याचा पोलीस शोध घेत आहेत.