सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तांदळाची पोती चोरणाºया दोघांना पकडले
By appasaheb.patil | Published: February 7, 2019 02:33 PM2019-02-07T14:33:31+5:302019-02-07T14:36:26+5:30
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया ...
सोलापूर : सोलापूररेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया दोघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी सकाळी मोठ्या शिताफीने पकडले.
रवींद्र नंदकुमार गायकवाड (वय ३६, सेटलमेंट फ्री कॉलनी, नं़ २) व युवराज यल्लप्पा जाधव (वय ३८, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी, नं़ १) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेचा मालधक्का आहे.
या मालधक्क्यावर नियमित सिमेंट व अन्नधान्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या तांदळाची पोती चोरून नेताना रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडले़ त्यांच्याकडून ६५० किलो वजनाची व १५ हजार रूपये किमतीचे तांदूळ जप्त केले आहे़ याबाबत रेल्वे पोलिसांत दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कामगिरी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयसिंग सातव, बी. आर. चौगुले, निरंजन जहागीरदार, रसूल सय्यद, देवेंद्र दहिफळे, शफिक शेख यांनी यशस्वी केली़