सोलापूर रेल्वेस्थानक विकासकामाचा उद्या शुभारंभ
By काशिनाथ वाघमारे | Published: August 5, 2023 06:38 PM2023-08-05T18:38:06+5:302023-08-05T18:38:32+5:30
भूमिपूजनासाठी मोठा मंडप अन् आखले नियोजन.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत सोलापूर विभागातील एकूण १५ रेल्वेस्थानकांचा वर्षभरात कायापालट होणार आहे. या कामाचा रविवार, ६ ऑगस्टपासून शुभारंभ होत असून, स्थानकावर एस्काॅर्टच्या बाजूला मालधक्का परिसरात याची जय्यत तयारी झाली आहे. सकाळी ९.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा खासदारांच्या उपस्थित होत असून, मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, मोठी आसनव्यवस्था केली असून, परिसरात विकासकामांनी गती घेतली आहे.
९० मिनिटांचा हा कार्यक्रम असून, व्हिडीओ स्क्रीन लावण्यात आला आहे. दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या १५ स्थानकांच्या विकासकामांचे उदघाटन होत असून, याचे थेट प्रक्षेपण असणार आहे. या कार्यक्रमानंतर शालेय मुलांना स्पर्धा पुरस्कार देऊन अतिथींच्या हस्ते गौरविले जाणार आहे.
आरपीएफचे झाले संचलन..
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)चे जवान तैनात ठेवण्यात येत आहेत. तसेच, शनिवारी सकाळी आरपीएफ जवानांचे संचलन झाले.