Solapur: पंढरपुरातील अवैध वाळू साठ्यावर महसूलची धाड; वाळू साठ्यासह वाहनेही केली जप्त

By Appasaheb.patil | Published: July 6, 2023 12:50 PM2023-07-06T12:50:14+5:302023-07-06T12:52:04+5:30

Solapur News: अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे.

Solapur: Revenue raid on illegal sand deposits in Pandharpur; Vehicles were also seized along with sand stock | Solapur: पंढरपुरातील अवैध वाळू साठ्यावर महसूलची धाड; वाळू साठ्यासह वाहनेही केली जप्त

Solapur: पंढरपुरातील अवैध वाळू साठ्यावर महसूलची धाड; वाळू साठ्यासह वाहनेही केली जप्त

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे कासेगांव (ता.पंढरपूर) येथे  अवैध  वाळू साठ्यावर  धडक कारवाई  केली असून, त्यामध्ये १० ब्रास वाळू  व ४ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक व साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. अवैध गौण खनिज विरोधी पथकाने मौजे कासेगाव येथील गट नंबर २७/ १ अ  येथे अचानक भेट दिली  असता,  सदर ठिकाणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांच्या  नावे असलेल्या गट नंबर २७/१अ  मध्ये १०  ब्रास  अवैधरित्या वाळूसाठा  केलेला दिसून आला. तसेच सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी एमएच ११ एजी २२७४ या क्रमांकाचा वाळूसाठी वापरण्यात येणारे पिकअप हे वाहन दिसून आले. तसेच वाहनामध्ये  वाळू भरण्यासाठी वापरलेले साहित्य  आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  या कारवाईमध्ये महसूल नायब तहसीलदार पी. के कोळी , मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे , तलाठी मुसाक काजी, राहुल गुटाळ  तसेच पोलीस कॉन्स्टेबल सहभागी होते.

Web Title: Solapur: Revenue raid on illegal sand deposits in Pandharpur; Vehicles were also seized along with sand stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.