Solapur: दूध दरासाठी कुर्डूत दीड तास रोखला रस्ता, तुटपुंज्या दरवाढ अध्यादेशाला दुग्धाभिषेक
By दिपक दुपारगुडे | Published: November 20, 2023 07:31 PM2023-11-20T19:31:30+5:302023-11-20T19:31:45+5:30
Solapur News: दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर - दूध दरवाढीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने माढा तालुक्यात कुर्डू येथे दीड तास रस्ता रोखून धरला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड व दूध उत्पादक आक्रमक होत शासनाने काढलेल्या तुटपुंज्या दरवाढीच्या अध्यादेशाला दुग्धाभिषेक घालून निषेध नोंदविला. शासनाच्या दरपत्रकाप्रमाणेसुद्धा दर नसून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रसंगी विजय भगत, संदीप पाटील, नितीन जगताप, तानाजी हांडे, मेजर चोपडे, किरण चव्हाण, आशा टोणपे, बालाजी जगताप, सचिन जगताप, सुहास टोणपे, दिनेश जगदाळे यांनी मते मांडली. यावेळी मागण्याचे निवेदन सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद नलवडे यांनी स्वीकारले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जगताप,सुहास टोणपे, आशा टोणपे, संगीता भोसले, सत्यवान गायकवाड, किरण चव्हाण, बाबाराजे जगताप, संतोष जगताप, शहाजी भोगे, संजय जगताप, संभाजी ब्रिगेड कुर्डू विभाग प्रमुख श्रीकांत गायकवाड, विजय भगत, बाळासाहेब भोसले, संदीप पाटील, नितीन जगताप, तानाजी हांडे, रामलिंग गाडे, रामहारी हांडे, प्रशांत पाटील, सतीश टोणपे, भारत जगताप, भारत पाटील, ज्ञानदेव चोपडे, चेअरमन गणेश जगताप, डॉ. नामदेव कापरे उपस्थित होते.
अर्ध्या तासाने सुटली वाहतूक कोंडी
यावेळी बार्शी-पुणे रस्त्यावरील वाहतूक दीड तास थांबली होती. वाहनांची रांग ही दीड किलो मीटरपर्यंत लागली. आंदोलनानंतर अर्धा तासाने वाहतूक पूर्ववत झाली. पोलिस प्रशासनाला कसरत करावी लागली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला.