Solapur: रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या ‘आरपीएफ’नं १४०० मुलांना शोधले
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 28, 2023 02:09 PM2023-02-28T14:09:11+5:302023-02-28T14:09:43+5:30
Solapur: सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - सोलापूर रेल्वेने विशेष मोहीम राबवून रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ लहान मुलांना शोधून काढले आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, शासकीय रेल्वे पोलिस तसेच इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. स्थानकावर हरविलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहीम राबविला असून, या मोहिमेचे कौतुक होत आहे.
प्रवाशांना सुखरूप प्रवास सेवा देण्यासोबत रेल्वेकडून प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही मोहीम होय. जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या रेल्वेस्थानकावर हरविलेल्या १,३९९ मुलांची सुटका पोलिसांनी केली आहे. यात ९४९ मुले आणि ४५० मुलींची समावेश आहे. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याकरिता चाइल्डलाइनसारख्या समाजसेवी संस्थांची मदत घेतल्याची माहितीदेखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक ६१५ मुलांची सुटका केली. ज्यात ४४१ मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागात सापडलेल्या ५८ मुलांमध्ये ३६ मुले आणि २२ मुलींचा समावेश आहे.