सोलापूर ग्रामीण पोलिस दल; पाेलिस भरतीमधील उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी सोमवारी शेवटची संधी
By Appasaheb.patil | Published: June 29, 2024 04:26 PM2024-06-29T16:26:13+5:302024-06-29T16:26:43+5:30
या चाचणीत असंख्य उमदेवारांनी चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली. या घटकात अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकात मैदानी चाचणी होती.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ग्रामीण पोलिस दल, सोलापूर अंतर्गत होत असलेल्या पेालिस भरती प्रक्रियेतील उमदेवारांसाठी एक दिलासादायक माहिती देणारी बातमी पुढे आली आहे. पोलिस भरतीमधील ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकात मैदानी चाचणी होती व परिणामी ते उमेदवार या घटकात त्यांना निश्चित करून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहू शकले नाहीत अशा सर्व उमेदवारांसाठी अंतिम संधी म्हणून १ जुलै २०२४ रोजी मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकान्वये दिली आहे.
सोलापूर ग्रामीण पेालिस दलात २०२२-२३ साठी शिपाई व चालक पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या उमेदवारांची १९ जून २०२४, २६ जून २०२४ व २८ जून २०२४ रोजी पोलिस शिपाई व २७ जून २०२४ व २९ जून २०२४ रोजी चालक पोलिस शिपाई पदाची मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत असंख्य उमदेवारांनी चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली. या घटकात अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकात मैदानी चाचणी होती.
परिणामी ते उमदेवार या घटकात त्यांना निश्चित करून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहू शकले नाहीत, अशा सर्व उमदेवारांना या घटकात मैदानी चाचणीकरिता अंतिम संधी १ जुलै २०२४ रोजी मैदानी चाचणी आयोजित केली आहे. अशा उमेदवारांनी ते इतर घटकात मैदानी चाचणीकरिता उपस्थित होते याचा पुरावा सोबत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. उपरोक्त दोन्ही प्रकारच्या उमेवारांनी १ जुलै २०२४ रोजी सकाळी ५ वाजता पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे हजर रहावे असे आवाहन पेालिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.