सोलापूर ग्रामीण पोलीसांची दारू अड्डयांवर धाड, ११ हजार लिटर रसायन नष्ट, सहा जणांविरूध्द गुन्हा

By admin | Published: April 22, 2017 03:26 PM2017-04-22T15:26:43+5:302017-04-22T15:26:43+5:30

.

Solapur rural police raid on liquor bars, 11 thousand liters of chemicals destroyed, crime against six | सोलापूर ग्रामीण पोलीसांची दारू अड्डयांवर धाड, ११ हजार लिटर रसायन नष्ट, सहा जणांविरूध्द गुन्हा

सोलापूर ग्रामीण पोलीसांची दारू अड्डयांवर धाड, ११ हजार लिटर रसायन नष्ट, सहा जणांविरूध्द गुन्हा

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : अक्कलकोट व बार्शी तालुक्यातील अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर धाड टाकून ५४ बॅरेलमधील ११ हजार लिटर रसायन नष्ट केले. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. या प्रकरणी वैराग व दक्षिण अकलकोट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरसेगाव व तडवळ बेकायदेशीररीत्या हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून १८ प्लास्टिक बॅरेलमधील ३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट केले. ते रसायन सुमारे ७२ हजार रुपयांचे होते.अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी रमेश संजय उमादी, बाबुशा गिरमल बिराजदार (रा.दोघे.कोरसेसगाव), रमेश हुबान्ना राठोड या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने व वैराग पोलिसांनी यामी तांडयावर धाड टाकून ७ हजार ४ लिटर रसायन नष्ट केले. वैराग पोलीस ठाण्यात या प्रकरणी शिवाजी पोमा पवार, तुकाराम मनोहर राठोड, राजु गणपत राठोड या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही कारवाई तब्बल ११ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याची किमत सुमारे २ लाख २० हजार रुपये आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू , अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार ,वैराग पोलीस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि उमेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, फौजदार नारायण शिंदे, पोलीस हवालदार सजेर्राव बोबडे, सचिन वाकडे, पोलीस नाईक विजय भरले, रवि माने, पोकॉ. सचिन गायकवाड, सचिन मागाडे, अरुण केंद्रे, समिर खैरे, अनिता काळे, अश्विनी गोटे, इस्माईल शेख, दिपक जाधव आदींनी ही कामगिरी केली.

Web Title: Solapur rural police raid on liquor bars, 11 thousand liters of chemicals destroyed, crime against six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.