पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सोलापूर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:28 PM2018-05-28T12:28:51+5:302018-05-28T12:28:51+5:30
संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेटसमोर निषेध व्यक्त करणारे आंदोलन करण्यात आले़
सोलापूर : पेट्रोल व डिझेलची उच्चांकी दरवाढ झाल्याने शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्यांना महागाईचा फार मोठा त्रास सोसावा लागत आहे़ त्यानिषेधार्थ सोलापूर शहरातील संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेटसमोर निषेध व्यक्त करणारे आंदोलन करण्यात आले़
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, दत्तामामा मुळे, परशुराम पवार, सुहास डोके, विजय पोखरकर, आकाश ननवरे, सुहास भोसले, राजेंद्र मुळे, रमेश जाधव, अरूण देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते़
यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ वाढत्या महागाईने व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने आता मर्यादा ओलांडली आहे़ त्यात आणखी भर पडल्यास सामान्य जनतेला ते असाह्य होणार आहे म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरीत महागाई कमी करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले़
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीत मोटारसायकल ठेऊन त्यांची मिरवणुक काढून वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदविला़ यावेळी सदर बझार पोलीसाच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़