Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

By Appasaheb.patil | Published: October 3, 2023 03:14 PM2023-10-03T15:14:19+5:302023-10-03T15:16:04+5:30

Solapur News: धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता.

Solapur: Sarkar kya hua tera wada? Dhangar Samaj took to the streets for reservation at Mohol | Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

Solapur: सरकार क्या हुआ तेरा वादा ?  मोहोळ येथे धनगर समाज आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आक्रमक झालेल्या धनगर समाजाने रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातील धनगर समाज बांधव मोहोळ शहरात दाखल झाले. आंदोलनकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यानं काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या आंदोलनामध्ये पारंपारिक धनगरी वेशात अनेकजण सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. या आंदोलनात सरकार क्या हुता तेरा वादा ? आरक्षण आमच्या हक्काचं ? यासह अन्य विविध मागण्यांसंदर्भातील पोस्टर आंदोलकांच्या हातात दिसून आले. याचवेळी आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Solapur: Sarkar kya hua tera wada? Dhangar Samaj took to the streets for reservation at Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.