Solapur: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा
By शीतलकुमार कांबळे | Published: April 7, 2023 05:46 PM2023-04-07T17:46:29+5:302023-04-07T17:46:52+5:30
Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
केंद्र शासनाने राष्ट्रीय पंचायत जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १७ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणार आहे. पंचायत राज पुरस्कारासाठी राज्यातून ११ पैकी ४ ग्रामपंचायती सोलापूरच्या असून सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव व पोषक युक्त गाव, गरीब मुक्त गाव या केंद्र शासनाचे ९ संकल्पनेच्या अनुषंगाने गावामध्ये विकास कामे करण्यात आली. त्याची दखल घेतल्याने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या ग्रामपंचायतींची निवड
अंकलगे (अक्कलकोट) - सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, यशवंत नगर (माळशिरस) - स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा, अर्धनारी (मोहोळ) - बालस्नेही गाव, भोसे (पंढरपूर) - सुशासन युक्त गाव.