मुलाखत ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणाºया प्रदुषणाबाबत सोलापुरकरांनी सजग राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:21 PM2018-11-02T16:21:31+5:302018-11-02T16:28:16+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.
बाळासाहेब बोचरे
सोलापूर: प्रदूषण हे मानवनिर्मित असून, मानवाने आणलेले संकट आहे. ते रोखणेही मानवाच्याच हातात आहे, अन्यथा हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. देशात प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरकरांनी तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक नवनाथ अवताडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारे प्रदूषण आणि त्यावर न्यायालयाने घातलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न: उत्सव आणि उत्साह यातून होणाºया प्रदूषणाकडे आपण कसे पाहता?
उत्तर: उत्सव म्हटले की उत्साह हा आलाच. अशावेळी आपण कोणतीच बंधने पाळत नाही. पण यातून निर्माण होणारे प्रदूषण उद्या आपल्यासाठीच जीवघेणे ठरणार आहे याची प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे. उत्सवात कर्णकर्कश आवाज, डीजेचा वापर तसेच मोठ्या आवाजाचे फटाके यामुळे बहिरेपणा, हृदयरोग, रक्तदाब, थकवा यांसारखे आजार उद्भवतात. शोभेच्या दारूपासून निर्माण होणाºया धुरापासून श्वसनाचे आजार होतात. फटाका अािण वाद्यांच्या वापरावर मर्यादा न राहिल्याने ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ झाल्याने याला कुठेतरी निर्बंध घालण्याची गरज होती. म्हणून कायदे करण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे.
प्रश्न: सोलापूर प्रदूषणाच्या बाबतीत देशातील १० प्रमुख शहरांमध्ये आहे, त्याचे कारण काय?
उत्तर: याला एक कारण नाही, अनेक कारणे आहेत. सोलापूरची भौगोलिक परिस्थिती कोरडे हवामान, पीकपरिस्थिती आणि रस्त्यावर कचरा टाकण्याची जनतेची मानसिकता ही काही कारणे त्यास कारणीभूत आहेत. यावर उपाय म्हणून प्रदूषण मंडळाने कृती आराखडा तयार केला असून, तो शासनाकडे पाठविला आहे.
प्रश्न: जलप्रदूषणाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर: जिल्ह्यातून वाहणाºया भीमा नदीच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर असून, या नदीचे प्रदूषण उद्भवापासूनच होते. त्यामुळे नमामि चंद्रभागा मोहिमेंतर्गत राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर शहरातील जलप्रदूषण रोखणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना मनपाला दिल्या असून, आजमितीला मनपाकडून तीन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्या माध्यमातून दररोज १०२.५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
प्रश्न : प्लास्टिक बंदीमुळे प्रदूषण नियंत्रणात आले काय?
उत्तर: होय! प्लास्टिकपासून निर्माण होणारे प्रदूषण जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले असून, यावर घातलेल्या बंदीचे जनतेमधून स्वागत केले जात आहे.