सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शहरात विभाजित कुटुंबं वाढल्यानं नंदीध्वजाची पूजा यंदा लवकरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:20 PM2018-12-01T12:20:54+5:302018-12-01T12:22:32+5:30
हर्र बोला हर्र : डिसेंबरमध्ये सुरू होणारा विधी नोव्हेंबर अखेरलाच सुरू
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाच्या पूजनाला शुक्रवारपासून घरोघरी सुरुवात झाली आहे़ यंदा आठ-दहा दिवस अगोदरच या पूजेला सुरुवात झाली असून, एकाच कुटुंबातील सदस्यसंख्या वाढणार असल्याने विभाजन झाले आहे़ यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या घरी नंदीध्वज पूजन करण्याची ओढ असते़ प्रत्येक सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास १५० ठिकाणी पूजन होते़ शहरात सरावाचे १८ नंदीध्वज असून, तीन हजार ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते़
कुंभारी रस्त्यावर माळीनगर येथे नागनाथ म्हेत्रे कुटुंबीयाकडून यंदाचे पहिले नंदीध्वज पूजन क रण्यात आले़ . सिद्धरामेश्वरांची भक्तीगीते वाजवण्यासोबत आरती करण्यात आली़ यात्रेतील तिसºया मानाच्या सराव नंदीध्वजाचे या वेळी पूजन करण्यात आले़ या वेळी मास्तर संजीव म्हेत्रे, मल्लिनाथ म्हेत्रे, वसंत म्हेत्रे यांच्यासह चंद्रशेखर म्हेत्रे, नागनाथ हक्के आदी उपस्थित होते़
१९७८ पासून म्हेत्रे यांच्या घरी नंदीध्वज पूजन करण्यात येते़ माळी समाजाचा नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू होतो़ पूर्वी गावठाण भागात असलेला हा समाज शहर विस्तारानंतर माळीनगर येथे राहावयास आला़ त्यासोबत गुरुसिद्ध म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे, आप्पाशा म्हेत्रे, चिदानंद म्हेत्रे, पांडुरंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीध्वज सराव या परिसरात सुरु करण्यात आला़ युवा पिढीतील श्रीकांत म्हेत्रे, केदारनाथ म्हेत्रे, योगीनाथ म्हेत्रे, श्रीधर माळी, सतीश माळी, म्हाळू जोडमोटे, मल्लिकार्जुन माळी, राजू कोळी, गोटू कदम, अमित म्हेत्रे हे अभियंता व शिक्षक असलेले भक्त सरावात सहभागी असतात़
सराव आणि पूजन
- नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू होतो़ दररोज दुपारी १२ ते ४ व रात्री ८ ते १२ या वेळेत सराव केला जातो़ कुंभारी रस्त्यावरील आकाशवाणी ते गोदुताई विडी घरकूल परिसरात हा सराव केला जातो़ त्यासोबतच शहरातील अशोक चौक, सत्तर फूट रोड, इंदिरा नगर, एकता नगर, भद्रावती पेठ, सोरेगाव, शेळगी, तुळजापूर रोड, जुळे सोलापूर परिसरातील नंदीध्वज पूजनासाठी नेले जाते़ ५ जानेवारीपर्यंत या नित्य पूजा सुरु असतात़