सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज आडवे न करता पूजा स्वीकारणार; यंदा अक्षता सोहळा दीड वाजताच संपविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:46 AM2018-12-03T10:46:53+5:302018-12-03T10:48:55+5:30

हिरेहब्बूंचा ऐतिहासिक निर्णय : बैठकीत ‘लोकमत’चाही उल्लेख; बाराबंदीधारकांनी इतरत्र फिरू नये

Solapur Siddheshwar Yatra; Nandvaj will accept worship without lying; This year, we will end at one and a half hour! | सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज आडवे न करता पूजा स्वीकारणार; यंदा अक्षता सोहळा दीड वाजताच संपविणार!

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज आडवे न करता पूजा स्वीकारणार; यंदा अक्षता सोहळा दीड वाजताच संपविणार!

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा १५ मानकºयांच्या वतीने नंदीध्वजास एकच खोबºयाचा हार पूर्वी यात्रा अगदी वेळेत व्हायची. तीच परंपरा पुन्हा यात्रेत आणण्याची शपथयात्रा वेळेत पार पाडण्यासाठी एकप्रकारची आचारसंहिताच त्यांनी भक्तगणांना घालून दिली

सोलापूर : यंदा प्रथमच मिरवणूक मार्गांवर नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारली जाईल.  तसेच अक्षता सोहळ्यादिवशी दुपारी दीडच्या आत अक्षता सोहळा संपविणार असल्याचाही ऐतिहासिक निर्णय मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी जाहीर करताच सिद्धरामेश्वर भक्तगणांनी ‘बोला, बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र... सिद्धेश्वर महाराज की जय’चा जयघोषात या निर्णयाचे स्वागत केले. 

सकाळी साडेनऊ-दहापासून संमती कट्टा परिसरात ताटकळत बसलेले भाविक. महिला, वृद्ध अन् बालगोपाळांना होणारा नाहक त्रास. गेल्या वर्षी दुपारी साडेतीन ते चार या वेळेत अक्षता पडल्याने अनेक भक्तगणांनी हिरेहब्बू मंडळींकडे नाराजी व्यक्त केली होती. भक्तगणांच्या या भावनेचा विचार करून यंदा यात्रेतील सर्वच विधी वेळेत पार पाडण्यासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानकरी, नंदीध्वजधारी, मास्तर यांच्यासह मान्यवरांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेताना भक्तगणांनी एकमुखाने हा निर्णय स्वीकारत यंदाचा यात्रा सोहळा देखणा करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.  

विशेष म्हणजे या बैठकीत ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या ‘शोभेच्या दारूकामाऐवजी लेसर शो’ या बातमीचाही उल्लेख केला गेला. यात्रेतील मानकºयांसह भक्तगणांच्या भावना, रुढी-परंपरेला धक्का लागणार नाही, याचा विचार करूनच हा ऐतिहासिक निर्णय घेत असल्याचे सांगत राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, यात्रेतील वाढती गर्दी, प्रत्येकाच्या घरासमोर नंदीध्वज आडवे करून होणारी पूजा, मिरवणूक मार्गांवर बांधण्यात येणाºया बाशिंगमुळे दरवर्षी नंदीध्वजांची मिरवणूक लांबतच चालली आहे. विशेषत: अक्षता सोहळ्यास सकाळपासून उपस्थित असलेल्या महिला, वृद्ध आणि बालगोपाळांचे होणारे हाल विचारात घेऊन लांबत चाललेली यात्रा वेळेत पार पाडण्यासाठी एकप्रकारची आचारसंहिताच त्यांनी भक्तगणांना घालून दिली. 

प्रारंभी देवस्थान पंच कमिटीचे माजी सदस्य नंदकुमार मुस्तारे यांनी प्रास्ताविकेत ३० वर्षांपूर्वीच्या यात्रेतील पुन्हा वैभव आणायचे  असेल तर हिरेहब्बू मंडळींना कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानकरी, भक्तगणांच्या भावनेला तडा न जाता हिरेहब्बू मंडळींनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा असेल, असा शब्द मुस्तारे यांनी तमाम भक्तगणांच्या वतीने दिला.

 पूर्वी यात्रा अगदी वेळेत व्हायची. तीच परंपरा पुन्हा यात्रेत आणण्याची शपथ घेऊ या, मुस्तारे यांच्या आवाहनास टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी प्रतिसादही दिला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवानंद हिरेहब्बू, मानकरी सुदेश देशमुख, पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, संजय दर्गोपाटील, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, माजी नगरसेवक राजशेखर चडचणकर, सोमनाथ मेंगाणे, सोमनाथ मेंडके, जनता बँकेचे संचालक महेश अंदेली, तम्मा मसरे, बाळासाहेब मुस्तारे, बिपीन धुम्मा, मल्लिनाथ खुने, अजित शेडजाळे यांच्यासह शंभरहून अधिक भक्तगण उपस्थित होते. 

१५ मानकºयांचा एकच हार; कुंभार समाजाचा निर्णय
- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभारकन्येचा झालेल्या विवाहामुळे यात्रेत कुंभार समाजाला विशेष मान आहे. समाजातील १५ जणांना अक्षता आणि होम प्रदीपन (कुंभारकन्येचे सती जाणे) या दोन सोहळ्यात मान दिला जातो. गेल्यावर्षापर्यंत कुंभारवाड्यासमोर प्रत्येक मानकºयांची स्वतंत्र  पूजा व्हायची. यंदा १५ मानकºयांच्या वतीने नंदीध्वजास एकच खोबºयाचा हार घालून पूजा करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी नगरसेवक तथा मानकरी भीमाशंकर  म्हेत्रे यांनी जाहीर केले. 

कुंभार समाजाने घेतलेला निर्णय स्तुत्य असून, इतर मानकरी आणि भक्तगणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. वेळेत यात्रा पार पाडण्यासाठी हिरेहब्बू मंडळींनी घेतलेल्या निर्णयाचे पंच कमिटीच्या वतीने मी स्वागत करतो.
-बाळासाहेब भोगडे, सदस्य, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी

अक्षता सोहळ्यावेळी संमती कट्ट्यावर बाराबंदीच्या पोषाखात नंदीध्वज पेलणारे उभे       राहिलेले असतात. त्यामुळे संमती वाचन करतानाचा प्रसंग भक्तगणांना दिसत नाही. नंदीध्वजधाºयांना तेथे उभे राहू न देण्याची व्यवस्था करावी.
-अजित शेडजाळे
भक्तगण


हिरेहब्बू मंडळींनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. होम प्रदीपन सोहळ्याच्या दिवशी नागफणा बांधलेला नंदीध्वज सायंकाळी ६ वाजताच पसारे यांच्या घरासमोरुन प्रस्थान झाला पाहिजे. तरच पुढे पहिला नंदीध्वज होम मैदानापर्यंत पेलण्यासाठी निसर्गाचीही साथ मिळेल.
-रेवणसिद्ध बनशेट्टी, मानकरी

यात्रेत रात्री १२ पर्यंत वाद्यांसह मिरवणूक काढण्यास एक दिवसाची परवानगी आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लक्ष घालून यंदा दोन दिवस परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. 
-धनेश हिरेहब्बू
भक्तगण

गेल्या काही वर्षांपासून नंदीध्वज मिरवणूक लांबत चालली आहे. लाखो भाविकांचा विचार करा. मानकरी, भक्तगणांनी आपल्या भावनांवर थोडा आळा घातला तर यंदाही ही यात्रा वेळेत पार पडेल.
- नंदकुमार मुस्तारे
माजी सदस्य- पंच कमिटी

मानकरी, नंदीध्वजधारकांना आवाहन

  • -   बाराबंदी घालून पान, तंबाखू, मावा, गुटखा खाऊ नका.
  • -  नंदीध्वजास बाशिंग बांधू नये. मानकरी ते नंदीध्वज स्पर्श करुन भाविकांना देतील.
  • -    नंदीध्वज एका ठिकाणी असताना बाराबंदी पोषाखात असलेले नंदीध्वजधारी इतरत्र वावरु नये.
  • -    चारही सोहळे आटोपल्यावर रात्री लवकरात लवकर नंदीध्वज आणण्याचा प्रयत्न करावा. 
  • -    मानकरी, भक्तगण ५१, १०१ खोबºयांचे हार आणले तरी केवळ २१ खोबºयांचेच हार स्वीकारण्यात येतील.
  • -     स्पर्श करणारे बाशिंग विकू नका. 

Web Title: Solapur Siddheshwar Yatra; Nandvaj will accept worship without lying; This year, we will end at one and a half hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.