सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; तीस वर्षांपूर्वी चालणारी परंपरा पुन्हा सुरू होणार; नंदीध्वज मार्गावर रोषणाईच्या जनजागृतीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:44 AM2018-12-24T10:44:20+5:302018-12-24T10:47:21+5:30

बदलतं सोलापूर, बदलती परंपरा

Solapur Siddheshwar Yatra; Thirty years ago, the tradition to be restarted; Speed of public awareness on the Nandy flag route | सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; तीस वर्षांपूर्वी चालणारी परंपरा पुन्हा सुरू होणार; नंदीध्वज मार्गावर रोषणाईच्या जनजागृतीला गती

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; तीस वर्षांपूर्वी चालणारी परंपरा पुन्हा सुरू होणार; नंदीध्वज मार्गावर रोषणाईच्या जनजागृतीला गती

Next
ठळक मुद्देवीरशैव व्हिजनच्या मोहिमेचा आज प्रारंभव्यापारी, राजकारणी, सेवाभावी संस्थांचाही पुढाकारश्री सिद्धरामेश्वर चरणी जनजागृती करणारे पत्रक अन् पत्र अर्पण करून मोहिमेचा शुभारंभ

सोलापूर : लक्ष-लक्ष दिव्यांनी मार्ग प्रकाशमय व्हावा... या प्रकाशमय मार्गावर सातही नंदीध्वजांची मिरवणूक उजळून निघावी यासाठी यंदा यात्रेचे औचित्य साधून वीरशैव व्हिजनने घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबतच्या केलेल्या जनजागृतीला चांगलीच गती मिळत असून, सोमवारी सकाळी ११ वाजता श्री सिद्धरामेश्वर चरणी जनजागृती करणारे पत्रक अन् पत्र अर्पण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

३० वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातील १५ दिवस नंदीध्वज मार्गांवर दिवाळीनंतरची दिवाळी असायची. ती प्रथा बंद झाली. मोबाईलचा जमाना आला. त्यानुसार काळ बदलला. घराघरांमधील, माणसा माणसांमधील, नात्यागोत्यातील संवाद या मोबाईलने दूर केला. नेमका याचा परिणाम अलीकडच्या काही वर्षांमध्ये ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेवरही दिसून येतोय. म्हणूनच मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात आयोजित नंदीध्वजधारी, भक्तगणांच्या बैठकीत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, माजी नगरसेवक नंदकुमार मुस्तारे यांनी भक्तगणांना, व्यापाºयांना घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला पहिला प्रतिसाद दिला ते वीरशैव व्हिजन या संघटनेने. गेल्या १०-१५ दिवसांपासून व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आणि त्यांच्या टीमने आवाहन करण्याबाबतचा आराखडा तयार केला आहे. आवाहन करणारी पत्रके, पत्रे छापून देण्याचा भार माजी नगरसेवक बाबुभाई मेहता यांनी उचलला आहे. 

काँग्रेस भवनही झळाळून निघणार- प्रकाश वाले
नंदीध्वज मिरवणूक मार्गावरच काँग्रेस भवन आहे. भवनची इमारत देखणी असून, यात्रेच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करून देखणी इमारत झळाळून निघेल, असा विश्वास शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला. वीरशैव व्हिजनने टाकलेले पाऊल स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

‘आॅर्किड’वर अन् बाळेही लख-लख होणार
- वीरशैव व्हिजनने बाळेतील कुमार करजगी यांच्या बंगल्यात बैठक घेऊन जनजागृती केली. वर्षा विभूते यांनी या उपक्रमास पाठिंबा देत जुनी मिल कंपाऊंडमधील नागेश आॅर्किड स्कूल, मॉलवर विद्युत रोषणाई करण्याचा विडा उचलला. इतर संघटना, व्यापारी, उद्योजकांनी वीरशैव व्हिजनची संकल्पना कृतीत आणण्याचे आवाहनही वर्षा विभूते यांनी केले. यावेळी रवी विभूते, चंद्रकांत रेड्डी, योगीनाथ चिडगुंपी, बाबू मुचलंबी, संगमेश्वर जेऊरगी, सिद्धय्या हिरेमठ, यशराज करजगी आदी उपस्थित होते. 

रेल्वे स्टेशन ते भैय्या चौक मार्गावर विद्युत रोषणाई
- वीरशैव व्हिजनच्या आवाहनास ओ देत काडादी चाळ नंदीध्वज सराव मंडळाचे पदाधिकारी सरसावले. रविवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिरातील बैठकीत श्रीशैल वर्दा यांनी उपक्रमास पाठिंबा देत माळगे फोटो स्टुडिओ ते शनि मंदिर आणि भैय्या चौक ते जुनी मिल कंपाऊंडमधील श्री आनंदेश्वर लिंगापर्यंत विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुले, सिद्धू बिराजदार, चिदानंद मुस्तारे, नागेश बडदाळ, भीमाशंकर तांडुरे यांनी उपक्रमाची माहिती देत नंदीध्वज मार्ग प्रकाशमय करण्याचे आवाहन केले. यावेळी दरेप्पा मसळी, मल्लिकार्जुन जम्मा, नागनाथआप्पा कळंत्री, सुदेश बाभूळगावकर, महालिंगप्पा मेंदगुदले, निंगप्पा मसळी, श्रीशैल वर्दा, श्रीकांत शेंडे, रेवणसिद्ध मायनाळे, अनंत अंजिखाने, राजू वाले, सातलिंगप्पा मल्लाडे, संतोष वाले, श्रीकांत वाले आदी उपस्थित होते.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची सोलापूरकरांवर कृपा आहे. म्हणूनच आजपर्यंत कुठले नैसर्गिक संकट आले नाही. यात्रा कालावधीत मी माझ्या दुकानावर विद्युत रोषणाई करुन आपली सेवा अर्पण करणार आहे. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील व्यापारी आणि व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन विद्युत रोषणाई करण्याबाबत विचार करावा. 
-अमित राजानी
व्यापारी- बाळीवेस

समतेच्या यात्रेत सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडते. नंदीध्वज मार्ग प्रकाशमय व्हावा, ही माझी अपेक्षा आहे. माझ्या दुकानावर लाईटिंग करून ती अपेक्षा प्रत्यक्ष भक्तगणांना कृतीत दिसणार आहे.
- समीर मणियार
व्यापारी-बाळीवेस

‘लोकमत’मध्ये वृत्त वाचून वीरशैव व्हिजनने मांडलेली संकल्पना खूपच आवडली. प्रत्येक व्यापाºयांनी ही संकल्पना कृतीत आणून ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांविषयी आपली श्रद्धा व्यक्त करावी.
-बाबुभाई मेहता, बांधकाम व्यावसायिक

समतेचे, एकात्मतेचे दर्शन घडणाºया ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त मी माझ्या भागात विद्युत रोषणाई करण्याबाबत प्रयत्न करणार आहे. व्यापाºयांमध्येही जनजागृती करणार आहे. 
- विनायक विटकर, नगरसेवक

Web Title: Solapur Siddheshwar Yatra; Thirty years ago, the tradition to be restarted; Speed of public awareness on the Nandy flag route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.