सोलापूर: ऑनलाइन मिळकत कर भरल्यास मिळणार सहा टक्के सवलत
By Appasaheb.patil | Updated: June 16, 2023 18:46 IST2023-06-16T18:45:51+5:302023-06-16T18:46:02+5:30
सोलापूकरांना दिलासा; टॅक्स भरण्यासाठीच्या ऑनलाइन सुविधा झाल्या सुरू.

सोलापूर: ऑनलाइन मिळकत कर भरल्यास मिळणार सहा टक्के सवलत
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडून शहर २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मिळकतीच्या बिलाचे वाटप सुरु करण्यात आलेले आहे. मिळकत कर भरण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मागील दोन ते तीन दिवसापूर्वी काही ऑनलाइन पेमेंट भरण्यासंदर्भात अडचणी होतो त्या त्याची तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ऑनलाइन पेमेंट सुविधा समस्या सोडवण्यात आली असून ऑनलाईन मिळकत कर भरणारे मिळकतदारांना ६ टक्के चालू आर्थिक वर्षातील मिळकत करावर सुट मिळणार आहे.
ऑनलाईन कर भरणेकरीता पेमेंट गेटवेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच याशिवाय हुतात्मा स्मृती मंदिर येथे ५ कॉउंटरवरुन मिळकत कर स्वीकारला जात आहे. तसेच नागरिकांच्या सोयी करीता विभागीय कार्यालय क्र.२, विभागीय कार्यालय क्र. ५, शेळगी पेठ, बाळे पेठ या ठिकाणचे कार्यालयामध्ये मिळकत कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. तरी मिळकतदारांनी नजिकच्या वरील ५ ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मिळकतदारांनी वरील ठिकाणी उघडण्यात आलेल्या कॉउंटरवर गर्दी न करता, ऑनलाईन सुविधेचा व सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.