सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून आंबेडकर चौकात होणार पहिला पादचारी सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:15 PM2018-02-28T13:15:47+5:302018-02-28T13:15:47+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. 

Solapur Smart City Scheme will be the first pedestrian signal in Ambedkar Chowk | सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून आंबेडकर चौकात होणार पहिला पादचारी सिग्नल

सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून आंबेडकर चौकात होणार पहिला पादचारी सिग्नल

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्पातून रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये खर्चून स्मार्ट रोड करण्याचे काम प्रगतीपथावर या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे सल्लागार, अधिकारी व वाहतूक पोलिसांबरोबर नुकतीच बैठकवायफाय की पोलीस आॅपरेटर बसवायचे याबाबत वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून सहा महिन्यांच्या आत स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयाकडे अहवाल द्यायचा आहे

राजकुमार सारोळे
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पातून साकारण्यात येणाºया स्मार्ट रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क चौक) पहिला पादचारी सिग्नल बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. 
स्मार्ट सिटी प्रकल्पातून रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये खर्चून स्मार्ट रोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर सध्या रंगभवन व डफरीन चौकात सिग्नल यंत्रणा आहे. रंगभवन चौकाकडून काम सुरू करण्यात आल्यामुळे या चौकातील सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या डफरीन चौकातील सिग्नल सुरू आहेत. आगामी काळात हे काम पुढे सरकल्यावर ही सिग्नल यंत्रणा काढून टाकण्यात येणार आहे. आंबेडकर चौकात चारही बाजूने येणारे रस्ते व महापालिकेची वर्दळ लक्षात घेऊन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव आहे. 
या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीचे सल्लागार, अधिकारी व वाहतूक पोलिसांबरोबर नुकतीच बैठक झाली. बैठकीत कंपनीचे सीईओ तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सिग्नल व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रंगभवन व डफरीन चौकातील काम पूर्ण झाल्यावर या ठिकाणी कॅन्टिलिव्हर सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्मार्ट सिटीतील पहिला पादचाºयांसाठी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मनपा, हुतात्मा सभागृह, सिद्धेश्वर मंदिर, पार्क स्टेडियम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजारपेठ, शाळांकडे येणाºयांची वर्दळ जास्त असते. यात पादचाºयांची संख्या जास्त असते. 
पादचाºयांना रस्ता ओलांडण्यासाठी इमर्जन्सी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकाचवेळी समूहाने रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी आल्यावर बटन दाबून चारही बाजूचे सिग्नल बंद करता येण्यासारखी सुविधा देण्यात येणार आहे. हे सिग्नल मॅन्युअली बसवायचे, वायफाय की पोलीस आॅपरेटर बसवायचे याबाबत वाहतूक पोलिसांनी अभ्यास करून सहा महिन्यांच्या आत स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयाकडे अहवाल द्यायचा आहे. 

Web Title: Solapur Smart City Scheme will be the first pedestrian signal in Ambedkar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.