सुरेश पाटील याच्या न्यायासाठी एकवटले सोलापूरकर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:56 PM2018-10-31T17:56:20+5:302018-10-31T17:59:17+5:30

भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या ताटात विष कालवणाºया गद्दाराला हुडका अन्यथा सोलापूर बंदची हाक दिली जाईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.

SOLAPUR SOLUTION TO SURE PATIL! | सुरेश पाटील याच्या न्यायासाठी एकवटले सोलापूरकर...!

सुरेश पाटील याच्या न्यायासाठी एकवटले सोलापूरकर...!

Next
ठळक मुद्देसुरेश पाटील यांच्यावर झालेल्या  विष प्रयोगाचा छडा लावण्यात यावा या मागणीसाठी मित्र परिवाराच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भवानीपेठेतील पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ

सोलापूर : भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या ताटात विष कालवणाºया गद्दाराला हुडका अन्यथा सोलापूर बंदची हाक दिली जाईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आयोजित जाहीर सभेत दिला. 

सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या  विष प्रयोगाचा छडा लावण्यात यावा या मागणीसाठी मित्र परिवाराच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भवानीपेठेतील पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बलीदान चौक, सराफकट्टा, माणिक चौक, विजापूरवेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आल्यानंतर सुरेश पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत सुनील खटके यांनी प्रास्ताविकात पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची पार्श्वभूमी सांगितली. महापालिकेच्या राजकारणात २५ वर्षात ठसा उमटविणाºया सुरेश पाटील यांच्यावर पद्धतशीरपणे विषप्रयोग करणाºयाचा ११ महिन्यात शोध होत नाही ही बाब गंभीर आहे असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन सलगर यांनी पाटील यांच्यामुळे महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा महापौर झाला. भाजपचे नेते मुंडे यांची घटना आम्ही पचविली, पण पाटील यांच्यावर विष प्रयोग केल्याचे उघड होऊनही गुन्हा दाखल केला जात नाही. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी आता जनताच त्याला शिक्षा करेल असे स्पष्ट केले. नगरसेवक अमोल शिंदे यांनी बोलताना पाटील यांनी नेतृत्वाने कामाचा दरारा निर्माण केला. अशा वाघाला संपविण्याचा प्रयत्न झाला. पण कलियुगातील या शंकराने ते विष पचविले व त्यातून बाहेर पडून महापालिकेत येतील यात शंका नाही. पण त्या गद्दाराचा छडा लावा म्हणून आज शाहीरवस्ती, घोंगडेवस्ती, भवानीपेठ, मराठावस्तील लोक घराला कुलूप घालून रस्त्यावर आलेत. आता आमचा अंत न पाहू नका अन्यथा सोलापूर बंद करू असा इशारा त्यांनी दिला. 

के. डी. कांबळे यांनी विषप्रयोग करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही गुन्हे गार शोधला जात नाही. सत्ताधाºयांना जागे करण्याची वेळ आली आहे असा इशारा दिला. तौफिक शेख यांनी घडल्या प्रकाराचा जाहीर निषेध करून गुन्हेगाराचा शोध घ्यावा या मागणीसाठी केव्हाही आंदोलन करण्यास तयार असल्याचे सांगितले. राजकुमार पाटील यांनी घटनाक्रम सांगितला व गद्दार आमच्यातील असेल तर त्याने आत्महत्या करावी अन्यथा आमच्या हाती लागल्यावर त्याचे खरे नाही असा इशारा दिला.

शहराच्या विकासासाठी बंडखोर नेता म्हणून सुरेश पाटील यांची कामगिरी असल्याचा उल्लेख सेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना तपास यंत्रणा हलत नाही याबाबत खंत व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी भ्याड कृत्याचा निषेध केला. नगरसेवक किसन जाधव यांनी थेलीयम मिलीटरीशिवाय बाहेर मिळत नाही. सत्ताधारी सभागृहनेत्यावर असा प्रसंग आल्यावर सरकार सहकार्य का करीत नाही असा सवाल केला.

काँग्रेसचे शहरअध्यक्ष प्रकाश वाले यांनी पाटील यांच्या जवळ राहणाºयानेच हे कृत्य केले आहे, अशा माकडाचा तात्काळ शोध घ्या अशी मागणी केली. उप महापौर शशीकला बत्तूल यांनी पोलिसांनी आत्तापर्यंत काय तपास केला याचा खुलासा करावा अशी मागणी केली. बिपीन पाटील यांनी वडीलांना न्याय द्यावा अशी विनवणी केली व उपस्थितांचे आभार मानले. शेवटी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदतान सीआयडीमार्फत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून गुन्हेगाराला शोधण्याची मागणी केली.

Web Title: SOLAPUR SOLUTION TO SURE PATIL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.