Solapur: साेलापूर ‘एमआयएम’मध्ये फूट, काँग्रेसविरुद्ध उमेदवार देण्यास विराेध
By राकेश कदम | Published: April 10, 2024 12:02 PM2024-04-10T12:02:31+5:302024-04-10T12:02:52+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आहे, असा आराेप काेमारूह सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला.
- राकेश कदम
साेलापूर - एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आहे, असा आराेप काेमारूह सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला.
सय्यद म्हणाले, देशाची लाेकशाही धाेक्यात आहे. अल्पसंख्याक समाजाच्या मनात भीती आहे. साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजपविरुध्द वातावरण आहे. या काळात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी काॅंग्रेसविरुध्द उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ भाजपचा फायदा हाेणार आहे. मागच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर साेलापूरचे उमेदवार हाेते. त्यांना केवळ दीड लाख मते मिळाली. आता यापेक्षा कमी मते मिळण्याचा अंदाज आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहाेत, असे सय्यद यांनी सांगितले. याेवळी महिला शहराध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक संघाचे रियाज सय्यद, ताैसीफ काझी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.