Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे स्टेटस ठेवले; पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासात पकडले
By Appasaheb.patil | Published: June 9, 2023 08:16 PM2023-06-09T20:16:26+5:302023-06-09T20:16:57+5:30
Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी वळसंग पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग चालू आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : धार्मिक भावना दुखाविणारे मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी वळसंग पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग चालू आहे असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
अनिरुद्ध जगदीश फलमारी (वय २१, विडी घरकुल, कुंभारी) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार शोएब मुश्ताक मगलुरकर याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ८ जून २०२३ रोजी शोहेब मंगळूरकर याच्या मोबाईलवर हिंदी भाषेत मजकूर लिहून समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचे उद्देशाने मोबाईलवर स्टेटस ठेवले. या मोबाईल स्टेटसमुळे धार्मिक भावना दुखावली गेली आहे व त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता धोका निर्माण झालेला आहे. शिवाय समाजात सामाजिक तेढ व एकोपा टिकविण्यास बाधक अशी व ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही समाजामध्ये धार्मिक तेढ वाढून भविष्यात मोठा दखलपात्र अपराध घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितास ताब्यात घेण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू आहे. पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जमादार यांनी दाखल केले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरवसे हे करीत आहेत.