Solapur: सुनील कांबळे खूनप्रकरणी शुक्रवारी सांगोला बंदची हाक
By शीतलकुमार कांबळे | Published: July 18, 2024 07:44 PM2024-07-18T19:44:35+5:302024-07-18T19:46:18+5:30
Solapur News: महुद येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे.
- शीतलकुमार कांबळे
सांगोला : महुद (ता. सांगोला) येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे. सकाळी १० वाजता सांगोला तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दामोदर साठे, उपाध्यक्ष विनोद रणदिवे यांनी सांगितले.
सांगोला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथून महात्मा फुले चौकापासून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील मातंग समाजातील स्त्री-पुरुष व युवक सहभागी होणार आहेत. तरी या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील सर्व सकल मातंग समाजातील बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या चिंतन बैठकीत सांगोला तालुक्यातील व इतर जिल्ह्यांतील समाजबांधव उपस्थित होते.