Solapur: यंदा आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; १५०० वैद्यकीय अधिकारी करणार उपचार - तानाजी सावंत
By दिपक दुपारगुडे | Published: June 7, 2023 08:32 PM2023-06-07T20:32:37+5:302023-06-07T20:32:57+5:30
Solapur: यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिली.
- दीपक दुपारगुडे
सोलापूर : यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिली.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिराची माहिती पत्रकारांना त्यांनी दिली. यावेळी प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, शिवाजी सावंत, अनिल सावंत, शिवाजी बाबर, श्याम गोगाव उपस्थित होते.
पुढे आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ह्या संकल्पनेवर आधारित २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात सुमारे २० लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.