Solapur tourism ; देशभरातील पर्यटकांना राजवाडा अन् श्री स्वामी समर्थांचं आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:34 PM2019-01-28T12:34:50+5:302019-01-28T12:36:20+5:30
शिवानंद फुलारी अक्कलकोट : येथील ऐतिहासिक राजवाडा, जागतिक पातळीवरील अग्निहोत्र केंद्र, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा संदेश ...
शिवानंद फुलारी
अक्कलकोट : येथील ऐतिहासिक राजवाडा, जागतिक पातळीवरील अग्निहोत्र केंद्र, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा संदेश जगाला देणारे श्री स्वामी समर्थ महाराज व स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यासह तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळे अक्कलकोटला नव्याने पर्यटनाच्या पटलावर आणत आहेत.
बसस्थानक परिसरात असलेल्या नवीन राजवाडा हा जुनाच असला तरी त्यात पर्यटनाच्या अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. येथील शस्त्रागार संग्रहालय आशिया खंडातील सर्वात मोठे आहे. इंग्रजांनी भेट दिलेला कारंजा आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. स्वामी समर्थांच्या वास्तव्याने अक्कलकोट सध्या धार्मिक पर्यटनस्थळ बनले असून, देशासह परदेशातील भाविक स्वामीचरणी लीन होण्यासाठी आणि शिवपुरी येथील अग्निहोत्र करण्यासाठी दाखल होत आहेत. बुधवार पेठेतील स्वामींचे समाधी मठ स्वामीजींची स्नानविहीर, गृह, भांडीकोंडी, पादुका आजही आहेत. राममंदिर, विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिरही धार्मिक केंद्र बनत आहेत.
शिवपुरी येथील गजानन महाराज यांची समाधी असून, त्या ठिकाणीचे यज्ञ स्तंभ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथील निसर्गोपचार केंद्र, भक्तनिवास, महाप्रसाद, याबरोबरच जागतिक अग्निहोत्र केंद्र आहे. भारत गल्लीतील गुरू मंदिरही त्याच तोडीचे आहे. तीस वर्षांपूर्वी केवळ अर्धा किलो तांदळावर चालू केलेल्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य प्रदेशात पोहोचले आहे. या ठिकाणी रोज १० ते १५ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. मंडळाच्या आवारातील शिवसृष्टी, शिवचरित्र, बागबगिचामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
अक्कलकोट संत व धार्मिक भूमी आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहर व परिसरातील देवदेवतांची मंदिरे आणखी विकसित होण्यासाठी मोठी संधी आहे. शहराजवळून जात असलेल्या महामार्गामुळे येणाºया काळात पर्यटकांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले
प्रमुख, शिवपुरी संस्थान, अक्कलकोट
या आहेत अपेक्षा
- - वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून दर्शनबारी तयार होणे, मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करणे, पालखी मार्गाचे विस्तारीकरण, हत्ती तलाव, संस्थानकालीन जिरणी तलाव, कुरनूर धरण येथे सुधारणा होणे अपेक्षित आहे.
वागदरीत परमेश्वर मंदिर
- - गौडगाव बु।। येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दुधनी, अक्कलकोट, वागदरी येथील जैन मंदिर, चपळगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, बºहाणपूरचे श्री सिद्धयप्पा, वागदरीतील श्री परमेश्वर मंदिर हेही धार्मिक पर्यटन केंद्र आहे. यासह अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत.;