Solapur: वाहन चालकांपासून मंडलाधिकाऱ्यांपर्यंत १५० जणांच्या बदल्या, जिल्हाअंतर्गत बदल्यांमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’
By संताजी शिंदे | Published: June 21, 2023 05:16 PM2023-06-21T17:16:55+5:302023-06-21T17:17:26+5:30
Solapur: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
- संताजी शिंदे
सोलापूर - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडल अधिकाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत १५० जणांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाअंतर्गत झालेल्या या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
महसूल विभागातील २८ मंडलाधिकारी, ५४ अव्वल कारकून, ६२ महसूल सहायक तर ६ वाहनचालकांच्या बदल्या झाल्या आहेत. वास्तविक पाहता ३१ मे अखेर या बदल्या अपेक्षित होत्या. मात्र, राज्य शासनाने ३० जूनपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. २८ मंडल अधिकाऱ्यांमध्ये मंडल अधिकारी उमेश डोईफोडे (बार्शी) यांची सौंदरे (बार्शी) येथे बदली करण्यात आली आहे. शोभना चव्हाण (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते पुनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), मनीषा लकडे (टेंभुर्णी ते करमणूक कर शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), सुजित शेळवणे (लवूळ ते टेंभुर्णी, ता. माढा) अशा बदल्या झाल्या आहेत.
बदल्या झालेल्यांमध्ये कंसात सध्याचे ठिकाण व बदली झालेले ठिकाण पुढीलप्रमाणे-
संतोष सुरवसे (चळे ते पुळूज ता. पंढरपूर), सारिका वाव्हळ (पेनुर ते कसबे सोलापूर), ज्ञानोबा माळी (वाघोली मोहोळ ते बोरामणी दक्षिण सोलापूर), गजानन जाधव (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १ ते विंचूर ता. दक्षिण सोलापूर), संतोष कांबळे (वागदरी ते बाळे उत्तर सोलापूर), अव्वल कारकून कलावती कोटे (तहसीलदार कार्यालय मोहोळ ते वाघोली मोहोळ), अनिल ठाकर (तहसीलदार करमाळा ते मंडलाधिकारी जेऊर करमाळा), मंडल अधिकारी रवींद्र ननवरे (सांगोला ते फोंडशिरस ता. माळशिरस), दीपक शिंदे (भंडी शेगाव ते चळे पंढरपूर) असे आहे.
काहींना मिळाली एक वर्षाची मुदतवाढ -
० सादिक काझी (अर्जुन नगर ते इंगायो अ. का. करमाळा), दिनेश भडंगे (महूद हे भंडी शेगाव पंढरपूर), संतोष फुलारी (विंचूर ते मंडलाधिकारी सिटी सर्वे उत्तर सोलापूर), रेवणाथ वळेकर (जेऊर करमाळा ते अर्जुननगर करमाळा), नागनाथ जोध (भोसे मंगळवेढा ते रोहियो तहसील करमाळा), संदीप चव्हाण (नातेपुते माळशिरस ते वेळापूर माळशिरस), बालाजी नागटिळक (पुनर्वसन शाखा सोलापूर ते अनगर मोहोळ), शेखर तपासे (पिलीव माळशिरस ते कुळ कायदा तहसील पंढरपूर), संतोष गोसावी अव्वल कारकून (करमाळा ते मंडलाधिकारी जिंती करमाळा), राजकुमार कोळी (चपळगाव अक्कलकोट, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ), अव्वल कारकून राजेंद्र बारगजे (करमणूक शाखा, सध्या पदावर एक वर्ष मुदतवाढ), सोमनाथ जाधव (आंधळगाव मंगळवेढा ते पेनुर मोहोळ), बाळू कदम (संगेवाडी सांगोला ते रोपळे पंढरपूर), गणेश तिके (पुळुज पंढरपूर ते कोळा सांगोला), तुकाराम कोळी (करमणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ते उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १) अशा बदल्या झाल्या आहेत.