सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर

By Appasaheb.patil | Published: November 29, 2022 05:47 PM2022-11-29T17:47:50+5:302022-11-29T17:50:58+5:30

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे.

Solapur-Tuljapur-Osmanabad new broad gauge railway line on fast track | सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर

googlenewsNext

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याशी जोडणारा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवा रेल्वे मार्ग आता फास्ट ट्रॅकवर येणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने मंगळवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ४५२.४६ कोटी रु.आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किमीच्या रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळाली आहे. रेल्वे मार्गातील लाईन मार्कींगचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे विभागातील अधिकारी आणि भूमिअभिलेख कार्यालया यांच्या संयुक्‍त विद्यमाने मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच मोजणीचा अंतिम अहवाल भूसंपादन अधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असून त्यानंतर जमिन मालकाला भूसंपादनाचे पैसे मिळणार आहेत. 

वर्षभरात होईल प्रत्यक्ष कामाला सुरुवात

भूसंपादनासाठीची मुख्य प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. कोणाचीही हरकत नसेल तर भूसंपादन लवकर होईल, त्यानंतर मुख्य कामासाठी पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे आराखडा तयार करून निधीची मागणी होईल, निधी मंजूर झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, काम सुरू झाल्यानंतर साधारण- एक ते दीड वर्षाच्या आत हा मार्ग तयार होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेतकरी आनंदी अन् प्रतीक्षेतही

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग आपल्या शेतातून जाणार व आपल्याला योग्य तो मोबदला मिळणार या आशेने उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आनंदी आहेत. शिवाय भूसंपादनाचे पैसे कधी मिळणार व रेल्वे कधी धावणार याबाबतचीही उत्सुकता शेतकऱ्यांना लागून राहिली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Solapur-Tuljapur-Osmanabad new broad gauge railway line on fast track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.