Solapur: सोलापुरात पाळत ठेवून दिवसा घर फोडणारे दोघे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त

By विलास जळकोटकर | Published: August 1, 2023 06:28 PM2023-08-01T18:28:21+5:302023-08-01T18:30:55+5:30

Solapur: दिवसा घरांवर पाळत ठेवून कोणी नसल्याची साधून घर फोडणाऱ्या दोघांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख १४ हजारांच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Solapur: Two who broke into a house during the day under surveillance in Solapur, seized goods worth lakhs | Solapur: सोलापुरात पाळत ठेवून दिवसा घर फोडणारे दोघे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त

Solapur: सोलापुरात पाळत ठेवून दिवसा घर फोडणारे दोघे गजाआड, लाखाचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

- विलास जळकोटकर 
सोलापूर-  दिवसा घरांवर पाळत ठेवून कोणी नसल्याची साधून घर फोडणाऱ्या दोघांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख १४ हजारांच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुबारक जोएफ पठाण १४ जुलै रोजी राहुल गांधी झोपडपट्टीतील घर फोडून चोरट्याने लोखंडी कपाटातून १ लाख १४ हजार रुपयांचे दागिने चोरले होते. याची २४ जुलै रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. मुबारक जोयब पठाण व उस्मान उर्फ लादेन महमदअली सय्यद (दोघे राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती काढली. याच झोपडपट्टीत राहणाऱ्या दोघांनी ही चोरी केल्याचे माहिती मिळाली. त्यातील दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. दिवसा घरफोड्या केल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, अंगठी असा १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठ दिवसात अशा तीन कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केल्या. ही कारवाई जेलरोडचे सपोनि निलेश पाटील-सोनवणे, सहा. फौजदार सातपुते यांच्या पथकाने केली.

Web Title: Solapur: Two who broke into a house during the day under surveillance in Solapur, seized goods worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.