Solapur: उजनी धरणाच्या पाणीपातळीत होतेय वाढ; दौण्डचा विसर्ग १९ हजारावर
By Appasaheb.patil | Published: July 27, 2023 03:35 PM2023-07-27T15:35:36+5:302023-07-27T15:36:31+5:30
Solapur: उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा १४.२० टक्के एवढी आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना चांगले जीवदान मिळत आहे. दरम्यान, काल रात्रभर चांगला पाऊस झाला. आज सकाळी ८.३० ला संपलेल्या २४ तासात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी काल दिवसभरात १ इंच पाऊस झाला आहे. उजनी धरणात येणारा दौण्ड विसर्ग १९ हजार क्युसेकवर असून उजनीची पाणीपातळी आज दुपारी १२ च्या सुमारास वजा १४.२० इतकी होती.