सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळ निवडणूक; खुल्या गटातून कोळेकर, कडू विजयी
By Appasaheb.patil | Published: September 30, 2022 12:15 PM2022-09-30T12:15:55+5:302022-09-30T12:16:06+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सिनेटच्या विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी झाली. यामध्ये खुल्या गटातून डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी १४ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विकास घुटे यांना आठ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. विकास कडू यांनी १६ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. श्रीराम राऊत यांना पाच मते मिळाली त्यांचा पराभव झाला.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात उपस्थित आहेत. पसंतीक्रमानुसार मतपत्रिकेवर मतदान झाल्याने निकाल हाती घेण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. कोटा पद्धत मतमोजणीला अवलंबण्यात येतो. त्यामध्ये पदवीधरसाठी अधिक मतदान असल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा अथवा शनिवारी सकाळी सर्व मतदार संघातील निकाल जाहीर होण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.